Hasan Mushrif : 'आगामी निवडणुकांमध्ये Mahayuti ची सत्ता आणा, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ'
मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात, 'राजकारणात मतदाराला दोष देऊन चालत नाही'
सेनापती कापशी : आगामी निवडणुकांमध्ये महायुतीची सत्ता आणा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देऊ, असेही ते म्हणाले, मांगनूर (ता. कागल) येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जनतेला व वाऱ्याला लाथ मारून चालत नाही, असे स्व. सदाशिवराव मंडलिक म्हणायचे, तेव्हा राजकारणात मतदाराला दोष देऊन चालत नाही. माझ्या राजकीय जीवनात बारवे-दिंडेवाडीकरांच्या मनाच्या मोठेपणामुळे धरण पूर्ण झाले, याचा मनस्वी आनंद होतो.
माजी खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी शासनाच्या सर्व योजना खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवल्या. यासाठी मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत यांच्यासह सूर्याजी घोरपडे, संजय जाधव, अशोक तोरस्कर, संदीप केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजक, गडहिंग्लज बाजार समितीचे संचालक धनाजी तोरस्कर यांनी saविविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी अंकुश माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, माजी सदा साखर संचालक आप्पासाहेब तांबेकर, कुश पाटील, माजी सरपंच चंदाराणी पाटील, बिद्रीचे संचालक रवींद्र पाटील, रंगराव पाटील, दिग्विजयसिंह पाटील मुरगूडकर, जोती मुसळे, बाळासो सांगले, सरपंच विनायक मुधाळे, साताप्पा पाटील, धनाजीराव काटे, शामराव पाटील-बाळेघोलकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल कुंभार यांनी केले. आभार संग्राम तोरस्कर यांनी मानले.