For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समर्थन द्या

10:37 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समर्थन द्या
Advertisement

मृणाल हेब्बाळकर यांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आपल्या मातोश्री मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. ही निवडणूक जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची व स्वाभिमानाचा विषय आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार असल्याने सर्वाधिक अनुदान आणण्यासाठी पूरक वातावरण आहे. राज्याची दुसरी राजधानी म्हणवून घेणाऱ्या बेळगाव जिल्ह्याचा अपेक्षेनुसार विकास झाला नाही. विकास हेच आपले ध्येय असल्याचे मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. केंद्रात कर्नाटकाच्या बाजूने आवाज उठविण्यासाठी आपण समर्थ असून बेळगाववर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समर्थन द्यावे, असे आवाहन मृणाल हेब्बाळकर यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.