For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विकासासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या

10:52 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
विकासासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या
Advertisement

लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी : यमकनमर्डी मतदारसंघात प्रचार

Advertisement

बेळगाव : गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात अपेक्षेपेक्षा अधिक विकासकामे केली आहेत. बसस्थानक, समुदाय भवन, रस्ते, मंदिर, मशीद, चर्च यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून सातत्याने विकासकामे केली जात आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील चिक्कलदिनी, होसगड, गेजपती, गुटगुद्दी, यल्लापूर आणि राजकट्टी गावांमध्ये प्रचार करून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. काँग्रेसकडून नेहमीच गोरगरिबांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांच्या उन्नतीसाठी योजना राबवून आर्थिकरीत्या सबल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देऊन आपणाला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यमकनमर्डी मतदारसंघातून नेहमीच काँग्रेस पक्षाला पाठिंबा मिळाला आहे. यावेळी काँग्रेसला बळकट करण्यासाठी अधिक मते देऊन सहकार्य करावे. महिला सबलीकरणासह शिक्षण, आरोग्य, रोजगार, यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मतदारसंघातील विविध महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारफेरीमध्ये सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला. याबरोबरच गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नेते, ग्रा. पं. सदस्य आदींनी प्रचारफेरीत सहभाग घेतला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.