For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विकासासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या

11:02 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
विकासासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या
Advertisement

माजी मंत्री एच. अंजनेय : प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : गेल्या 10 वर्षांपासून केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारकडून केवळ खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली आहे. कोणतेही विकासकाम साधलेले नाही. जनहितासाठी व विकासासाठी चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री एच. अंजनेय यांनी केले. नागरमुन्नोळी येथे उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार करून ते बोलत होते. राज्यातील काँग्रेस सरकारकडून गॅरंटी योजना समर्पकपणे राबविल्या जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन सहा महिन्यांमध्ये पूर्ण केले आहे. महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन आर्थिकरीत्या सबल करण्यासाठी सरकारकडून योजना सुरू करण्यात आल्या आहेत. गृहलक्ष्मी, शक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणाला वेग देण्यात आला आहे. पाच गॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना मोठी आर्थिक मदत मिळाली आहे. केंद्रामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास केंद्राकडून जाहीर करण्यात आलेल्या गॅरंटी योजना समर्पकपणे राबविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेत असताना देशात अनेक विकासकामे राबविण्यात आली आहेत. मोठमोठे प्रकल्प राबवून देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाने मोठे योगदान दिले आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजेंद्र सन्नकी, बसवराज बसवगुद्दी, अनंतकुमार ब्याकोड, सुनीता ऐहोळे, शिवपुत्र मनगोळी, प्रशांत ऐहोळे, शिवानंद रॅई, शंकर गुद्दी आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.