For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना समर्थन द्या

11:41 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना समर्थन द्या
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : सुलधाळ येथे प्रचार करून विशेष पूजा

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा गोकाक व इतर भागामध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून प्रचार करण्यात आला. या दरम्यान त्यांनी सुलधाळ येथे हनुमान जयंतीनिमित्त विशेष पूजा केली. गोकाक तालुक्यातील सुलधाळ येथे त्यांनी प्रचार केला. यावेळी त्यांनी मतदारांना मृणाल हेब्बाळकर यांना सर्वाधिक मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. राज्य सरकारकडून गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक विकासाभिमुख योजना राबविल्या जात आहेत. हे सरकार गोरगरिबांचे आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये गॅरंटी योजनांच्या माध्यमातून दिली जाणारी मदत अनेकांना वरदान ठरली आहे. महिला सबलीकरण करण्यावर सरकारकडून भर दिला जात आहे. महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत देऊन आर्थिकरीत्या सबल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी काँग्रेसला समर्थन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या दरम्यान सुलधाळ गावातील हनुमान मंदिराला भेट देऊन विशेष पूजा केली. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.