For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओरोस ,रानबांबुळीतील नागरिकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा

01:01 PM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ओरोस  रानबांबुळीतील नागरिकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा
Advertisement

जि. प. सदस्या सुप्रिया वालावलकर , विनायक अणावकर यांचे विशेष प्रयत्न

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी आणि ओरोस -सिंधुदुर्गनगरी ,पडवे, गावराई परिसरातील ग्रामस्थांची गॅस सिलिंडरसाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी 'संघाचे' संचालक विनायक अणावकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे ओरोस, रानबांबुळी गावात गॅस सिलिंडरची गाडी प्रत्यक्ष दाखल झाली असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.काही दिवसांपासून या भागात गॅस पुरवठ्याबाबत समस्या जाणवत होती. ही बाब लक्षात घेऊन जि.प. सदस्या सुप्रिया वालावलकर आणि रानबांबुळी सरपंच परशुराम परब , विनायक अणावकर यांनी तातडीने हालचाली करत संबंधित यंत्रणेशी समन्वय साधला आणि गावात सिलिंडर उपलब्ध करून दिले. याबद्दल ओरोस रानबांबुळी गावाच्या वतीने जि. परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर आणि सरपंच श्री. परशुराम परब यांनी विनायक अणावकर यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत. कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधी आणि संचालकांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.