For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये एसआयआरची पुरवणी मतदारयादी जाहीर

06:38 AM Mar 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये एसआयआरची  पुरवणी मतदारयादी जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री दुसरी पुरवणी मतदारयादी जाहीर केली. तथापि, किती नावे जोडली किंवा वगळली गेली, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आयोगाच्या म्हणण्यानुसार, बूथनिहाय यादी रात्री 11:30 च्या सुमारास वेबसाइटवर अपलोड करण्यात आली होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे समाविष्ट किंवा वगळलेल्या नावांच्या संख्येची माहिती मिळू शकली नाही. यापूर्वी, सोमवारी पहिली पुरवणी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या मतदारयादीत 13 लाख नावे वगळण्यात आली होती. ही नावे ‘न्यायनिर्णयाधीन’ होती, म्हणजेच आयोग त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करत होता. आयोगाच्या म्हणण्यानुसार, 60 लाखांहून अधिक नावे या श्रेणीत ठेवण्यात आली होती. राज्यातील एसआयआरदरम्यान 58 लाख नावे वगळण्यात आली. परिणामी, राज्यातील मतदारांची संख्या 7.66 कोटींवरून 7.08 कोटींपर्यंत कमी झाली. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीत ही संख्या आणखी कमी होऊन 7.04 कोटी झाली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.