Sangli News | सांगलीत 'खाकी'चा अनोखा उपक्रम! एसपी तुषार दोषींची बापट मळ्यातील कट्ट्यावर बसून 'चाय पे चर्चा'
सांगली -जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मंगळवारी सकाळी महावीर उद्यान (बापट मळा) परिसरात भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. तब्बल दीड तास विविध स्तरांतील नागरिकांशी चर्चा करून त्यांनी कायदा-सुव्यवस्था, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्र, नशाखोरी, अवैधधंदे आणि गुन्हेगारीविषयी प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट घेतला.काही तक्रारींची गांभीयनि दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर फोन करून कारवाईचे आदेश दिले.
सकाळी पोलीस अधीक्षकांची गाडी महावीर उद्यानाजवळ दाखल होताच उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर दोषी यांनी योगा ग्रुप, हास्य क्लब, मॉर्निंग वॉक करणारे ज्येष्ठमहावीर उद्यान परिसरातील कट्ट्यावर बसून जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी नागरिकांसोबत चहाचा आस्वाद घेत मुक्त संवाद साधला. सामान्य नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
नागरिक, महिला, डॉक्टर, व्यापारी आणि तरुणांशी संवाद साधला. पोलिसांकडून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, कोणत्या भागात गुन्हेगारी किंवा अवैध प्रकार सुरू आहेत, महिलांना किंवा ज्येष्ठांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याबाबत माहिती घेतली.
लोकहित मंचाचे मनोज भिसे यांच्या पुढाकाराने आयोजित या संवादामध्ये नागरिकांनी कॉलेज कॉर्नर, शंभर फूट रस्ता, बापट मळा, विश्रामबाग, संजयनगर आणि स्टैंड चौक परिसरात काही ठिकाणी मुलींची छेडछाड, नशेखोरांचा त्रास आणि अवैध धंद्यांविषयी तक्रारी मांडल्या. यावर तातडीने कारवाईचे आश्वासन दिले.
एका नागरिकाने हातभट्टी सुरू असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकाला फोन करून कारवाईचे आदेश दिले. ज्येष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबने 'मुक्तहास्यासन'च्या अनोख्या पद्धतीने त्यांचे स्वागत केले. संवादादरम्यान त्यांनी नागरिकांमध्ये बसून सामान्य नागरिकांप्रमाणे चहाचा आस्वाद घेत 'चाय पे चर्चा' केली.