For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलिस अधीक्षक करतात उपअधीक्षकांची कामे

02:47 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोलिस अधीक्षक करतात उपअधीक्षकांची कामे
Advertisement

पोलिस खात्यात 36 उपअधीक्षकांच्या जागा रिक्त

Advertisement

शैलेश तिवरेकर/पणजी

राज्य पोलिस खात्यात 19 उपअधीक्षकांना पोलिस अधीक्षकपदावर बढती देण्यात आली, मात्र बढती देऊन जवळपास सहा महिने उलटल्यानंतरही, या सर्वांना उपअधीक्षकपदाच्याही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. रिक्त झालेल्या उपअधीक्षकपदाच्या जागा अद्याप भरलेल्या नाही, त्यामुळे ही गैरसोय झाली आहे. गोवा पोलिसांना उपअधीक्षकांची 47 पदे मंजूर झालेली आहेत, मात्र सध्या केवळ 11 उपअधीक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे 36 उपअधीक्षकांच्या कमतरतेमुळे अधीक्षकांना एकाच वेळी दोन, तीन आणि काही प्रकरणांमध्ये चार जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. उपअधीक्षक पदे भरण्यावरून हा विभाग वादात सापडला आहे.

Advertisement

ऑक्टोबर 2025 मध्ये, गोवा सरकारने गोवा पोलिस सेवा नियमांमध्ये सुधारणा करून थेट उपअधीक्षक भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा 30 वरून 40 वर्षे केली, तसेच काहींसाठी 45 वर्षांपर्यंत शिथिलता दिली. नवीन नियमांनुसार, उपअधीक्षकपदांच्या 60 टक्के जागा पात्र पोलिस निरीक्षकांना बढतीसाठी राखीव ठेवण्यात आल्या. यापूर्वी 28 उपअधीक्षकांची पदे थेट भरण्यासाठीची प्रक्रिया सुऊ करण्यात आली होती. त्यासाठी 2 हजार 500 अर्ज आले होते. भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली असतानाच ती रद्द करण्यात आली होती.

त्यानंतर नवीन भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. एका वर्षापूर्वी, गोवा लोक सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष जोस मॅन्युएल नोरोन्हा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर सरकारने 28 उपअधीक्षकपदांसाठीची थेट भरती मोहीम रद्द केली आहे. ही रद्दबातल केलेली प्रक्रिया वादग्रस्त ठरली, कारण ती भरती धोरणातील बदलांच्या वेळीच झाली आणि निवड प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच हा निर्णय घेण्यात आला. उपअधीक्षक पदे भरण्यावरून गोवा लोकसेवा आयोग आणि सरकार यांच्यात मतभेद राहिले आहेत.

Advertisement
Tags :

.