‘सुपरगर्ल’पुढीलवर्षी प्रदर्शित होणार
डीसी स्टुडिओजचा नवा चित्रपट
‘सुपरगर्ल’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर-ट्रेलर निर्मात्यांनी जारी केला आहे. अॅक्शनने भरपूर या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविली आहे. टीझर-ट्रेलरची सुरुवात एका सामान्य किशोरवयीन मुलीने होते, जिचे जीवन अत्यंत व्यग्र आहे. परंतु विशिष्ट स्थिती निर्माण झाल्याने तिला स्वत:च्या सुपरपॉवरचा वापर करावा लागतो, वाईट लोकांपासून जगाला वाचवावे लागते. या कामात तिची मदत एक अनोळखी मुलगी करते. सुपरगर्ल या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रेग गिलेस्पी यांनी केले आहे.
हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. जून महिन्यात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट ‘सुपरगर्ल’मध्येही ‘सुपरमॅन’च्या पातळीची अॅक्शन आणि व्हीएफएक्स पहायला मिळणार आहेत. यातील खलनायकही अत्यंत क्रूर दिसून येत आहे. या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेवरून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.