For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्योतिकासोबत झळकणार सनी देओल

06:18 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्योतिकासोबत झळकणार सनी देओल
Advertisement

अँथनी चित्रपटाची झाली घोषणा

Advertisement

बॉर्डर 2 च्या यशानंतर अभिनेता सनी देओलला अनेक प्रोजेक्ट ऑफर होत आहेत. यंदा सनी देओलचे अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याचदरम्यान त्याचा नवा चित्रपट ‘अँथोनी’ची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली आहे. या अॅक्शन थ्रिलरमध्ये सनी देओलची जोडी दाक्षिणात्य लेडी सुपरस्टारसोबत जमणार आहे.

अॅक्शन हीरो म्हणून सनी देओल हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. सनी देओलच्या नव्या अॅक्शनपटाची घोषणा आता निर्मात्यांनी केली आहे. या चित्रपटात सनी देओल हा ज्योतिका या अभिनेत्रीसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत केली जाणार आहे.

Advertisement

बालाजी गणेशकडून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले जाणार आहे. बालाजी यांनी यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक ए.आर. मुरुगदॉस यांच्यासोबत सह-दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. कहाणी लेखन, दिग्दर्शक आणि चित्रपट साकारण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. या सस्पेंस थ्रिलरद्वारे बालाजी गणेश हे दिग्दर्शनाच्या जगतात पाऊल ठेवत आहेत. सनी देओलच्या या चित्रपटाचे चित्रिकरण यापूर्वीच सुरू झाले आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.