For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सनी देओलचे तिकीट कापले

06:22 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
सनी देओलचे तिकीट कापले
Advertisement

भाजपच्या आठव्या यादीत तीन राज्यातील 11 नावे जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपने शनिवार, 30 मार्च रोजी लोकसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. या यादीत तीन राज्यांतील 11 उमेदवारांची नावे आहेत. ओडिशातून 3, पंजाबमधून 6 आणि पश्चिम बंगालमधून 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने पंजाबमधील गुऊदासपूर मतदारसंघातून दिनेश सिंग ‘बब्बू’ यांना संधी देत अभिनेता सनी देओलचे तिकीट कापले. सनी देओलने अलिकडेच निवडणुकीच्या रणधुमाळीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Advertisement

आठव्या यादीत अमृतसरमधून तरनजीत सिंग संधू, जालंधरमधून सुशीलकुमार रिंकू, फरीदकोटमधून हंसराज हंस यांना तिकीट दिले आहे. या यादीत इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना संधी दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. रवनीत सिंह बिट्टू यांना लुधियानामधून उमेदवारी देण्यात आली आहे. बिट्टू हे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परिणीती कौर यांना पटियालामधून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अमेरिकेतील माजी भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू अमृतसरमधून राजकीय पदार्पण करणार आहेत. ही जागा भाजपने 2019 मध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि 2014 मध्ये अऊण जेटली यांना उभे करून जिंकण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केले होते.

Advertisement
Tags :

.