‘एंटनी’ चित्रपटात सनी देओल
बंटवारा 1947 च्या चित्रपटाला फारसे यश न मिळाल्यावर अभिनेता सनी देओलने आता स्वत:च्या आगामी चित्रपटासाठी तयारी सुरू केली आहे. या नव्या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून यातील लुक सोशल मीडियावर समोर आला आहे.
एंटनी नाव असलेल्या या चित्रपटात सनी देओल एका दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाजी गणेश करत आहे. सनी देओलसोबत या चित्रपटात दक्षिणेतील यशस्वी अभिनेत्री ज्योतिका महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. तर अभिनेता विजय वर्मा यात खलनायकाची भूमिका साकारतोय. एंटनी चित्रपटात सनी देओलसोबत रवि किशन देखील पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात दिसून येणार असल्याचे समजते.
बॉर्डर 2 आणि बंटवारा 1947 या चित्रपटानंतर सनी देओलने स्वत:च्या तिसऱ्या चित्रपटासाठी कंबर कसली आहे. त्याचा पुढील चित्रपट रामायण पार्ट-1 असून याचे दिग्दर्शन नितेश तिवारीने केले आहे. या चित्रपटात सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारत असून हा चित्रपट 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.