‘गबरू’त सनी देओल
68 वर्षीय सनी देओल आता ‘गबरू’ चित्रपटात दिसून येणार आहे. सनी देओलने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. सनी देओल सध्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत असल्याने त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. सनीने गबरू चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले.
याच्या पॅप्शन दाखल त्याने ‘शक्ती तुम्ही दाखविता ती नसते, तर तुम्ही जे करता ती शक्ती असते. गबरू चित्रपट 13 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. साहस, विवेक आणि करुणेची ही कहाणी असेल’ असे नमूद केले आहे. मोशन पोस्टरमध्ये सनी अत्यंत गंभीर आणि भावुक अवतारात दिसून येत आहे. एका दृश्यात तो एका रक्ताने माखलेला मुलीला मांडीवर घेऊन असल्याचे दिसून येते. हा एक अॅक्शन-एंटरटेनर चित्रपट असेल, ज्यात सनी देओल अॅक्शन अवतारात दिसून येईल. चित्रपटाची कहाणी शशांक उदयपूरकर यांनी लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शन केले आहे.
सनीने अलिकडेच ‘बॉर्डर 2’ चे चित्रिकरण पूर्ण केले असून यानंतर तो रामायण चित्रपटातील भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. याचबरोबर तो ‘लाहौर 1947’ आणि ‘गदर 3’ चित्रपटात दिसून येईल. हे सर्व चित्रपट 2026-27 मध्ये प्रदर्शित होतील तर ‘सूर्या’, ‘सफर’ आणि ‘बाप’ हे चित्रपटही तो करणार आहे.