इक्का“मध्ये सनी देओल अन् अक्षय
सनी देओलचा एक चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असून यात त्याच्यासोबत अक्षय खन्ना दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘इक्का“ असून याच्या माध्यमातून सनी देओल अन् अक्षय सुमारे 29 वर्षांनी एकत्र झळकणार आहेत. यापूर्वी दोघांनी 1997 साली ‘बॉर्डर“ चित्रपटात एकत्र काम केले होते. इक्का हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. हा एक कोर्टरुम ड्रामा असून यात सनी देओल वकिलाच्या भूमिकेत तर अक्षय खन्ना आरोपीच्या पिंजऱ्यात दिसून येणार आहे. यात अक्षय हा नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारत आहे. इक्का चित्रपट 10 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार आहे. या कोर्टरुम ड्रामामध्ये अक्षय अन् सनी देओल आमनेसामने असतील. अक्षय अन् सनी देओल यांच्यासोबत या चित्रपटात दीया मिर्झा, तिलोत्तमा शोम, संजीदा शैख आणि आकांक्षा रंजन कपूर आहे. चित्रपटात तिलोत्तमा शोम एका सरकारी वकिलाच्या भूमिकेत असून ती न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध आहे, तर दीया एक पत्नी अन् आईच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्राने केले आहे.