सुनिता विल्यम्सचा अंतराळातून परतीचा प्रवास सुरु
'ड्रॅगन' या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर 'सुनीता विल्यम्स' आणि 'बुच विल्मोर' यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार १० वाजून ३५ मिनिटांनी हे आंतराळयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनहून वेगळं म्हणजे अनडॉक केलं आहे.
'ड्रॅगन' या अंतराळयानाचं अनडॉकींग अनेक गोष्टींवर अवलंबून होतं. यामध्ये अंतराळयान आणि रिकव्हरी टीमची तयारी ही हवामान, समुद्राची परिस्थिती आणि इतरही अनेक कारणीभूत ठरणारे घटक समाविष्ट आहेत. नासा आणि स्पेसएक्स हे 'क्रू-९' च्या परत येण्याच्या वेळेलाच स्प्लॅशडाऊन स्थानाची जागा निश्चित करतील.
'सुनीता विल्यम्स' आणि 'बुच विल्मोर' या दोन अंतराळवीरांनी ५ जून २०२४ रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले.
'सुनीता विल्यम्स' आणि 'बुच विल्मोर' ५ जून २०२४ रोजी स्टारलाइनरमधून 'इंटरनॅशनल स्पेस सेंटर'साठी उड्डाण घेतलं होतं. तिथं ८ दिवसांसाठी गेलेले 'सुनीता विल्यम्स' आणि 'बुच विल्मोर' तब्बल नऊ महिने अडकून पडले होते.