For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनीता विल्यम्सचे अंतराळात अडकणे धोकादायक

06:36 AM Feb 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुनीता विल्यम्सचे अंतराळात अडकणे धोकादायक
Advertisement

कल्पना चावलाच्या अपघाताप्रमाणेच ही घटना गंभीर असल्याचा निर्वाळा

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सुनीता विल्यम्स यांचे अंतराळात अडकणे धोकादायक असल्याचे मान्य केले आहे. नासाने या मोहिमेला टाइप ए अपघात म्हणून वर्गीकृत केले असून ही सर्वात गंभीर श्रेणी आहे. चॅलेंजर आणि कोलंबिया शटल अपघातांसाठी देखील ही श्रेणी वापरली गेली. कोलंबिया शटल अपघातात भारतीय अंतराळवीर कल्पना चावला हिचा मृत्यू झाला होता.

Advertisement

19 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या 311 पानांच्या अहवालात नासाचे प्रशासक जेरेड इसाकमन यांनी अनेक बाबी उघड केल्या आहेत. सुनीता विल्यम्सच्या मोहिमेत गंभीर त्रुटी होत्या. त्यांनी एजन्सी आणि बोईंगवर त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल जोरदार टीका केली. सुनीता विल्यम्स 2024 मध्ये आठ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्या होत्या, परंतु तांत्रिक समस्यांमुळे त्यांचे परतणे नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत लांबले होते.

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स 27 वर्षांनंतर जानेवारी महिन्यात निवृत्त झाल्या आहेत. त्यांची निवृत्ती 27 डिसेंबर 2025 रोजी लागू झाली. तथापि, नासाने 20 जानेवारी रोजी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली होती. सुनीता 27 वर्षांपूर्वी 1998 मध्ये नासामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी तीन नासा मोहिमांमध्ये भाग घेत 608 दिवस अंतराळात घालवले. 9 डिसेंबर 2006 रोजी ती पहिल्यांदा अंतराळात गेली. सुनीता यांनी एकूण 62 तास सहा मिनिटे नऊ अंतराळयात्रा केल्या. हा कोणत्याही महिला अंतराळवीराचा सर्वात मोठा कालावधी आहे.

Advertisement
Tags :

.