For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनीता विल्यम्स यांची अंतराळ झेप लांबणीवर

06:22 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुनीता विल्यम्स यांची  अंतराळ झेप लांबणीवर
Advertisement

तांत्रिक समस्येमुळे अंतिम क्षणी उ•ाण रद्द

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा तिसरा अवकाश प्रवास पुढे ढकलण्यात आला आहे. प्रत्यक्षात तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफच्या 90 मिनिटे आधी मोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील उ•ाणाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

Advertisement

सुनीता विल्यम्स मंगळवारी तिसऱ्यांदा अंतराळ यात्रेला जाणार होत्या.  फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी 8.04 वाजता सुनीता विल्यम्स बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून उ•ाण करणार होती. तथापि, टेकऑफच्या 90 मिनिटे आधी शास्त्रज्ञांना अंतराळ यानाच्या ऑक्सिजन वाल्वमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आल्यामुळे उ•ाण रद्द करण्यात आले. सुनीता विल्यम्ससोबत नासाचे शास्त्रज्ञ बॅरी विल्मोर हेही बोईंगच्या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार होते. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात विक्रमी 322 दिवस घालवले असून सर्वाधिक तास स्पेसवॉक करणारी महिला शास्त्रज्ञ होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

Advertisement
Tags :

.