For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनिता केजरीवाल प्रचारात सहभागी

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुनिता केजरीवाल प्रचारात सहभागी
Advertisement

पक्षाच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचाराला बळ मिळेल असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. त्या रविवारी दिल्लीतील रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीमुळे दिल्लीच्या तिहार कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांचे संदेश आणण्याचे आणि प्रसिद्ध करण्याचे काम सुनिता केजरीवाल या करीत आहेत. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत आम आदमी पक्षाचा प्रचार काहीसा थंडावला असल्याचे बोलले जात आहे. आता सुनिता केजरीवाल यांच्या सहभागामुळे प्रचारात जोमदारपणा येईल, असे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.

Advertisement

काँग्रेसशी युती

काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेसशी हाडवैर असणाऱ्या आम आदमी पक्षाने यंदा दिल्लीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती केली आहे. दिल्लीतील 7 लोकसभा जागांपैकी आम आदमी पक्ष चार तर काँग्रेस 3 जागांवर लढत आहे. आम आदमी पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीतही समाविष्ट झाला आहे. तथापि, पंजाबमध्ये या पक्षाने काँग्रेसशी युती न करता सर्व 13 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनेही या राज्यात सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. दिल्लीत आम आदमी पक्ष पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि नवी दिल्ली या चार मतदारसंघांमध्ये लढत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार करणार

आम आदमी पक्षाच्या वाट्याला आलेल्या सर्व चार मतदारसंघांमध्ये सुनिता केजरीवाल प्रचार करणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या रविवारी त्या पूर्व दिल्लीतील उमेदवार कुलदीप सिंग यांच्या रोडशोमध्ये सहभागी होणार असून नंतर इतर मतदारसंघांमध्येही त्यांचा प्रचारात भाग असेल.

Advertisement
Tags :

.