For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : एकत्रित ताकदीमुळे विजय निश्चित ! 

12:19 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news   एकत्रित ताकदीमुळे विजय निश्चित   
Advertisement
                                  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरेंचा दावा; इथे कोणताही चमत्कार नाही
Advertisement

रत्नागिरी: आगामी निवडणूक आम्ही महायुती म्हणून पूर्ण ताकदीने लढवत आहोत. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या पाठिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे भक्कम आशीर्वाद आहेत. महायुतीच्या या एकत्रित ताकदीमुळे आमचा एकतर्फी विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी येथील पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

कोकण विधानपरिषदेच्या या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे, हे आम्ही नाकारत नाही. २०१८ ते २०२४ या काळात अनिकेत तटकरे यांनी प्रत्येक नियोजन बैठकीला हजेरी लावून स्थानिक प्रश्न सोडवले आहेत. राजकारणात चर्चा, वाटाघाटी आणि काहीवेळा संघर्ष होत असतो. मात्र आता त्या चर्चावर पडदा टाकणे आवश्यक आहे. या मतदारसंघात कोणत्याही 'चमत्कारा'ला जागा नाही. इथे थेट 'नमस्कार'च आहे. जिल्हा परिषद निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढलो असल्याने काही प्रश्नांवर मतमतांतरे असू शकतात.
मात्र कोणत्याही नेत्यासोबत चर्चा करण्याची गरज भासल्यास मी स्वतः नक्कीच पुढाकार घेईन. आमच्यात कोणताही दुरावा असण्याचे कारण नाही. काही गैरसमज असल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी झोपेचं सोंग घेणाऱ्यांना उठवता येत नाही राऊत व्दयींवर टीका शिवसेना (ठाकरे गट) नेते विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना राजकारणात ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे, त्यांना कधीच उठवता येत नाही.
सध्या अशीच काहीशी परिस्थिती संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्या बाबतीत झाली आहे. ते केवळ वास्तवापासून दूर पळत आहेत, अशी टीका केली. स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे काळजी घेणार महायुतीमधील समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतली. पुढच्या काळात कोणतेही गैरसमज होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ, असे तटकरे म्हणाले.
महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते (शिंदे-फडणवीस-पवार) जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल. नेतृत्वाने घेतलेला निर्णय प्रमाण मानून काम करणे हेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. वडेट्टीवारांवर टीकास्त्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे वैफल्यग्रस्त होऊन टीका करत असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.
Advertisement
Tags :

.