For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुनिल राऊळ बिनविरोध

11:50 AM Jul 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुनिल राऊळ बिनविरोध
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुनिल बाबु राऊळ तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर काशिनाथ कोरगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी जॉय पिटर डॉन्टस व उपाध्यक्षपदी सुनिल बंधुकांत नाईक यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. त्यानंतर शुक्रवारी अध्यासी अधिकारी तथा सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक सुजय एस. कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी यावेळी फेडरेशनचे सचिव महेश्वर कुंभार, संचालक बाबुराव कविटकर, समिर वंजारी, सुभाष चौधरी विष्णु पराडकर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष यांचे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी अभिनंदन केले. यावेळी सुजय एस. कदम यांनी पतसंस्थांना उद्भवणाऱ्या समस्या सांगून त्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांना मार्गदर्शन तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यास सुचवून तसेच यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.यावेळी अध्यक्ष सुनिल राऊळ यानी पतसंस्था फेडरेशन हे सहकारी पतसंस्थासाठी काळाची गरज असून फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच पतसंस्थाच्या वसुलीबाबत वेगवेगळ्या स्थरावर मार्गदर्शन करणार आहे. पतसंस्था ह्या सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करुन सर्वसामान्यांना उभारी देण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे ही पतसंस्था चळवळ सक्षमपणे चालविण्यासाठी फेडरेशनचे प्रयत्न राहतील. तसेच यासाथीत जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे सहकार्य अपेक्षित असून जिल्हयातील पतसंस्थाना प्रत्यक्ष संपर्क करण्यात येणार आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यासाठी पतसंस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव याच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले .

Advertisement
Advertisement
Tags :

.