महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोजिमाशि पतपेढीच्या चेअरमनपदी सुनील पाटील

05:53 PM Jan 24, 2024 IST | Kalyani Amanagi
Advertisement

सांगरूळ प्रतिनिधी

Advertisement

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी सुनील कृष्णात पाटील (एस के) (सांगरुळ हायस्कूल,सांगरूळ ) यांची तर व्हा. चेअरमनपदी विठ्ठल मारुती लटके (सांगशी हायस्कूल सांगशी ) यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकार निबंध कार्यालयाचे अधीक्षक मिलिंद ओतारी यांनी काम पाहिले.

Advertisement

सात जानेवारी रोजी झालेल्या पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रा जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीने सर्वच्या सर्व सतरा जागा जिंकत संस्थेवरील सत्ता अबाधीत राखली होती .पदाधिकारी निवडीच्या अगोदर सुकाणू समितीचे नेते आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी सुकाणू समितीचे सदस्य व नवनिर्वाचित संचालकांशी चर्चा करून चेअरमन व्हा. चेअरमन यांची नावे बंद लिफाफ्यातून संचालक मंडळाच्या बैठकीत दिली .

यानुसार चेअरमन पदासाठी सुनील पाटील व व्हा. चेअरमन पदासाठी विठ्ठल लटके यांचा प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद ओतारी यांनी सुनील पाटील यांची चेअरमनपदी तर विठ्ठल लटके यांची व्हा चेअरमनपरी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले .
करवीर व गगनबावडा तालुक्याला चेअरमन व व्हा .चेअरमन पदाची संधी मिळाली आहे

यावेळी सुकाणू समिती सदस्य वसंतराव देशमुख, के के पाटील , व्ही जी पवार , एस डी लाड , बापूसाहेब शिंदे , उदय पाटील,किरण पास्ते एस डी जरग ,बाबासाहेब पाटील , आर एस मर्दाने , संजय डी पाटील , अभिजित गायकवाड संचालक , राजेंद्र कारंडे गजानन काटकर सरदार पाटील ,कृष्णात पाटील महादेव पांडुरंग चौगले ,के.एच.पाटील, शिवाजी लोंढे, जयसिंग पवार ,धनाजी पाटील , दिलीप पाटील ,हिंदुराव डोंब ,उमेश माळी शानाजी माने , रेखा रावराणे ,सुप्रिया शिंदे ,व्यवस्थापक अभय व्हनवाडे यांच्यासह शिक्षक सभासद उपस्थित होते.

बिनविरोध निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नूतन चेअरमन सुनील पाटील यांनी पतपेढीचे सभासद सुकाणू समिती व संचालक मंडळांने मोठ्या विश्वासाने चेअरमन पदाची संधी दिली आहे .आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू समिती सदस्य व संचालक मंडळाच्या सहकार्याने पतपेढीच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. नूतन व्हा. चेअरमन विठ्ठल लटके यांनी आभार मानले .

Advertisement
Tags :
Chairmankojimashi credit banksunil patil
Next Article