सुनील पालने एका इन्स्टाग्राम रीलद्वारे त्यांच्यातील सुरू असलेल्या वादावर भाष्य करत समय रैनाला थेट संदेश पाठवला . या व्हिडिओमध्ये मिमिक्री कलाकार जय वर्मा होता, ज्याने समयच्या खास लकबींची हुबेहूब नक्कल केली होती, तर सुनीलने त्याचे संवाद म्हटले होते.
Sunil Pal on Samay Raina "तू ब्रश का नाही करत? समय रैनाच्या डिवचणाऱ्या विनोदावर भडकले सुनिल पाल, म्हणाले "तू रात्रीच्या वेळी"....
'इंडियाज गॉट लेटंट' या आपल्या शोमधून वादळी प्रसंग स्वत:वर ओढवणाऱ्या कॉमेडियन समय रैनाने पुन्हा एकदा स्वत:भोवती एक वाद निर्माण केला आहे. एका शोमध्ये विनोदी अभिनेते सुनिल पाल (samay raina on sunil pal) यांना एक डिवचणारा विनोद केल्याने समय पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान समयच्या या विनोदावर सुनिल पाल यांनीही एक रील शेअर करत उत्तर दिले आहे.
नेमका वाद काय?
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाने अलीकडेच 'इंडियाज गॉट लेटंट सीझन २' च्या प्रीमियर दरम्यान आपला पूर्वी वापरलेला 'आप ब्रश क्यूँ नहीं करते?' हा विनोद पुन्हा एकदा वापरला . या कृतीमुळे सहकारी कॉमेडियन सुनील पालसोबतचे त्याचे जुने शाब्दिक युद्ध पुन्हा पेटले आहे. सुनीलने प्रत्युत्तर द्यायला अजिबात वेळ लावला नाही. त्याने आता या टोमण्याला स्वतःच्याच एका खुमासदार उत्तराने प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामुळे त्यांच्यातील हा तिखट विनोदी वाद सुरूच राहणार आहे.
सुनिल पालचा पलटवार
व्हायरल झालेल्या "ब्रश जोक"वर बोलण्यापूर्वी सुनीलने समयच्या नावावर हलके-फुलके विनोद केल्याने व्हिडिओ सुरू झाला. सुनील म्हणतो: "समय रैना, मैं तुझे इस्लीये माफ कर रहा हूँ क्यूंकी रात के टाइम हम शो करते है और तेरे नाम का मतलब ही रात का टाइम है. समय मतलब टाइम और रैना मतलब रात. रात के समय की हम आदर करते है."
जय बॅकग्राऊंडला बोलत असताना, सुनील पाल यांनी समय रैनाला उद्देशून एक वाक्य म्हटले. सुनिल पाल म्हणाले, "भाई, मैं ब्रश नहीं करता हूं तूने ऐसा मुझे बोला था ना? पर समय रैना तू तो ब्रश करता है, तेरे मुह से इतनी गंदगी क्यूं निकलती है भाई?"
वादाची सुरुवात कशी झाली?
समय रैना आणि सुनील पाल यांच्यातील तणाव गेल्या वर्षीपासूनचा आहे. 'इंडियाज गॉट लेटंट'च्या पहिल्या सीझनमध्ये वापरलेल्या अनुचित भाषेवर सुनीलने उघडपणे टीका केल्यावर हा तणाव सुरू झाला . त्यावेळी, सुनीलने सुचवले होते की समयने कपिल शर्माकडून स्वच्छ विनोदाची कला शिकली पाहिजे. नंतर समयने त्याच्या ' स्टिल अलाइव्ह' या कमबॅक स्टँड-अप स्पेशलमध्ये प्रत्युत्तर देताना, कपिल शर्माला स्वतःला 'इंडियाज गॉट लेटंट'मध्ये यायचे होते असा दावा केला आणि सुनीलला 'असुरक्षित' व 'निराश' म्हटले.
गेल्या महिन्यात 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये एकत्र आल्यावर त्यांचे मतभेद अधिकच स्पष्ट झाले . त्या एपिसोडदरम्यान, सुनीलने समयच्या विनोदी शैलीवर पुन्हा एकदा टीका केली. समयने एका विनोदानेच त्याला प्रत्युत्तर देत म्हटले: "हे सगळं ठीक आहे, पण मला हे सांगा: तुम्ही दात का घासत नाही?