सुनील भारती मित्तल यांना ‘जीएसएमए लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार
नवी दिल्ली :
भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना आज बार्सिलोना येथे सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये टेलिकॉम उद्योगाची जागतिक संस्था उएश्A कडून लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारती एअरटेलने एका निवेदनात ही माहिती दिली.
स्पेनचे राजा फेलिप सहावा, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ आणि कॅटालोनियाचे अध्यक्ष साल्वाडोर इला आणि जागतिक उद्योग प्रमुखांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक दूरसंचार परिदृश्याला आकार देण्यात आणि जगभरातील ऑपरेटर, सरकारे, व्यवसाय आणि अब्जावधी ग्राहकांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यात त्यांच्या भूमिकेची दखल हा पुरस्कार घेतो. जीएसएमएच्या इतिहासात, हा पुरस्कार अनेक उद्योगातील दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान जागतिक संप्रेषण परिसंस्थेवर कायमस्वरूपी आणि निर्णायक प्रभाव पाडणाऱ्या योगदानाची दखल घेतो.