महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सनबर्न उधळून लावणारच

12:26 PM Dec 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचा पुनरुच्चार

Advertisement

पेडणे : संस्कृती संवर्धन करणऱ्या पेडणे तालुक्यात आणि खास करून पेडणे मतदारसंघातील देव देवतांच्या भूमीत सरकारने सनबर्न लादण्याचा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पेडण्यातील जनता सज्ज झाली आहे. सनबर्न  महोत्सावाविरोधात आपण जनतेसोबत राहणार असून आपला त्याला कडाडून विरोध आहे. हा महोत्सव आपण उधळून लावणार म्हणजे लावणारच, असा इशारा पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पुन्हा सरकारला दिला आहे. जे जनतेला नको, ते प्रकल्प आणि ते महोत्सव आपल्यालाही लोकप्रतिनिधी या नात्याने पेडणे मतदारसंघात नकोत. सरकारने जबरदस्तीने हा महोत्सव काही ठराविक जणांना हाताशी धरून पेडणेतील जनतेच्या माथी मारू नये, असा सल्ला आर्लेकर यांनी दिला आहे.

Advertisement

रवींद्र भवन हवे, सनबर्न नको 

पेडणे हा तालुका संस्कृती जपणारा तालुका आहे. या तालुक्याने भजन, नाट्या, संगीत, लोककला ही आपली संस्कृती जपली आहे. ही संस्कृती जपण्यासाठी सरकारने भावी युवा पिढीसाठी चांगले उपक्रम, चांगल्या महोत्सव या ठिकाणी जरूर आयोजित करावेत. रवींद्र भवन प्रकल्पासारखा कलाकारांना व्यासपीठ देणारा प्रकल्पाचे काम सरकारने लवकर मार्गी लावावे. जेणेकरून कलाकारांना आपली कला या ठिकाणी सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल. सनबर्नसारख्या पाश्चात्त्य संस्कृतीचे उदात्तीकरण करण्याचा सरकारला पेडण्यात मोह का पडला? असा प्रश्न आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केला आहे.

तीन दिवसात आर्थिक परिस्थिती सुधारणार?

केवळ तीन दिवस चालणाऱ्या सनबर्नमधून पेडण्यातील युवकांची आर्थिक स्थिती कशी सुधारणार? तेथे तरुणांना रोजगार मिळणार, टॅक्सीवाल्यांना भाडी मिळणार तसेच त्या ठिकाणी स्टॉल घालायला मिळेल, अशी आमिषे काही जणांकडून दाखवण्यात आली आहे. सनबर्नचे समर्थन करणारे पंचायत मंडळही हेच सांगते. पण सनबर्नमध्ये पेडणेचे युवक चहा, बटाटवड्याचे स्टॉल घालणार काय? तेथे आवश्यक असलेले महागडे स्टॉल पेडणेकर घालू शकतात का? असे प्रश्न उपस्थित करुन या दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीपासून पेडणेतील युवकांनी सावध राहावे, असेही आर्लेकर म्हणाले.

राखीव मतदारसंघात सनबर्न कशाला?

पेडणे हा मतदारसंघ राखीव आहे आणि या मतदारसंघातून जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहे. आपल्याला विश्वासात न घेता हा महोत्सव या ठिकाणी आयोजन करण्याचे सत्र सरकारने अवलंबिलेले आहे. मात्र लोकप्रतिनिधीचा आदर न करणे ही अत्यंत चुकीची बाब असून आपणही सरकार पक्षाचा घटक असून आपण भाजप पक्षाचा आमदार आहे. भाजप पक्षाचे सरकार गोवा राज्यात आहे. त्यामुळे अशा गोष्टी आयोजित करताना स्थानिक आमदाराला डावलून असे महोत्सव सरकार कसे काय करू शकते असाही प्रश्न त्यांनी केलेला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article