महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘सनबर्न’ ही आपली संस्कृती नव्हे!

12:46 PM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दक्षिण गोव्यातून सनबर्नला विरोध : समविचारी नागरिकांकडून माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलाबाहेर निषेध रॅली

Advertisement

मडगाव : ‘सनबर्न’ ही आपली संस्कृती नाहीच, त्यामुळे त्याला संपूर्ण दक्षिण गोव्यातून विरोध होणार आहे. सरकारला जर संगीत रजनीचे कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर त्यांनी गोव्यातील म्युझिक बँडना संधी द्यावी. गोव्यात चांगले कलाकार आहेत. त्यांना संधी मिळायला पाहिजे. सनबर्न कोणत्याही परिस्थितीत दक्षिण गोव्यात होऊ दिला जाणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाला विरोध होऊ लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण व उत्तर गोव्यातील नागरिकांनी काल रविवारी माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलाबाहेर निषेध रॅली काढली. या निषेध रॅलीत एकत्र आलेले नागरिक हे समविचारी होते आणि कोणत्याही राजकीय संलग्नतेशी संबंधित नव्हते.

Advertisement

दक्षिण गोव्यात सनबर्नला परवानगी देऊ नये, अशी सर्वसामान्यांची मागणी असताना, या आंदोलनासाठी उपस्थित असलेल्या पेडणे तालुक्मयातील नागरिकांनी  उत्तर किंवा दक्षिण गोव्यात कोणत्याही भागात सनबर्न होऊ देऊ नये, असे सांगितले. सनबर्नमध्ये मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थाचा वापर होत असल्याने युवा पिढीवर त्याचे वाईट परिणाम होत आहेत. सनबर्नचे आयोजन करून प्रथम त्यांनी उत्तर गोवा संपवला, आता त्यांना दक्षिण गोवाही संपवण्यासाठी इथे यायचे आहे का? असा सवाल एका महिलेने यावेळी उपस्थित केला.

गोव्यातील संणाना प्रोत्साहन द्या!

‘सनबर्नऐवजी, गोव्यातील प्रतिभा दाखविणाऱ्या सणांना प्रोत्साहन देण्यावर सरकार का लक्ष केंद्रित करत नाही? आमच्याकडे संगीतकार आहेत जे गोव्यातून परफॉर्म करण्यासाठी इतर राज्यात जातात. गोव्यातील कलाकारांसाठी संधी मिळायला पाहिजे अशी मागणी यावेळी केली. विकास भगत यांसारख्या इतरांनी सहमती दर्शवली आणि त्याऐवजी गोव्याच्या संस्कृतीला समानार्थी असलेल्या उत्सवाचा प्रचार केला पाहिजे. गोव्याच्या अस्मितेचा एक भाग असलेल्या ‘घुमटा’चा वापर करून या पर्यायी गोवा-केंद्रित महोत्सवात प्रचार करायला हवा, असेही सांगितले.

पर्यटनाच्या नावे दिशाभूल!

त्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) राज्य संयोजक अमित पालेकर, वेळ्ळीचे आमदार व्रुझ सिल्वा आणि पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक हे देखील उपस्थित होते. त्यांनी यावेळी आपले विचार मांडले. आमदार व्रुझ सिल्वा यांनी दक्षिण गोव्यातील जनतेला जिह्यात हा उत्सव नको आहे यावर भर दिला, इतर आंदोलक म्हणाले की, या उत्सवाचा बचाव करणाऱ्यांनी पर्यटनाला चालना मिळेल या कारणास्तव दिलेली कथा दिशाभूल करणारी आहे.

विविध ग्रामसभांतूनही विरोध 

दरम्यान, दक्षिण गोव्यात रविवारी झालेल्या काही ग्रामसभांतून सनबर्नला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. सरकारने स्थानिक लोकांच्या भावनाची कदर करावी व सनर्बनेचे आयोजन रद्द करावे, कशी मागणी ग्रामसभांतून झाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article