For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड परिसरात उन्हाळी भात सुगीचा हंगाम जोमात

11:19 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
नंदगड परिसरात उन्हाळी भात सुगीचा हंगाम जोमात
Advertisement

नियोजनाअभावी साठवलेले पाणी वाया : ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची ओढाताण

Advertisement

वार्ताहर/हलशी

नंदगड परिसरात सध्या उन्हाळी भात पिकाचा म्हणजेच ‘वायंगण’ सुगीचा हंगाम मोठ्या उत्साहात सुरू आहे. येथील शेतकरी पीक काढणीत मग्न असला, तरी सिंचनाच्या अपुऱ्या सोयी आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे शेती धोक्यात आली आहे. विशेषत: नंदगड धरणाच्या दुरवस्थेमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून लघुपाटबंधारे विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

Advertisement

कै. बसापण्णा अरगांवी यांचे स्वप्न : शेतकरी कल्याणासाठी धरणाची निर्मिती

नंदगड परिसरातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी, या उदात्त हेतूने कै. बसापण्णा अरगांवी यांनी दूरदृष्टी ठेवून धरणाची निर्मिती केली होती. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज या भागातील शेकडो एकर जमिनीवर भात आणि ऊस यासारखी नगदी पिके घेतली जात आहेत. मात्र ज्या हेतूने या धरणाची उभारणी झाली त्याला आता सरकारी अनास्थेचे ग्रहण लागले आहे. सध्या या धरणाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. धरणाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन्ही बाजूंचे मुख्य दरवाजे पूर्णपणे नादुरुस्त आहेत. यामुळे साठवलेले पाणी वाया जात असून, ऐन उन्हाळ्dयात पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे.

धरणाचे दरवाजे नादुरुस्त : पाण्याचा विसर्ग अनियंत्रित

सध्या या धरणाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. धरणाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन्ही बाजूंचे मुख्य दरवाजे पूर्णपणे नादुरुस्त आहेत. दरवाजे व्यवस्थित बंद होत नसल्याने किंवा उघडताना अडचणी येत असल्याने पाण्याचे नियोजन करणे अशक्य झाले आहे. यामुळे साठवलेले पाणी वाया जात असून, ऐन उन्हाळ्dयात पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे.

कालव्यांची दुरवस्था व गळतीमुळे पाण्याची नासाडी होत आहे. केवळ धरणाचे दरवाजेच नव्हे, तर धरणातून शेतापर्यंत पाणी पोहोचवणारे दोन्ही बाजूंचे कालवेही मोडकळीस आले आहेत. सदर कालव्यांचे काँक्रीटीकरण आवश्यक आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना तडे गेले असून झुडपे वाढली आहेत. यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. यामुळे ग्रा. पं.ने वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.

लघुपाटबंधारे विभागाला साकडे

नंदगड धरण आणि परिसरातील इतर तलावांची स्थिती पाहता, लघुपाटबंधारे विभागाने झोपेतून जागे होणे गरजेचे आहे. धरणाच्या दरवाजांची दुरुस्ती आणि कालव्यांचे नूतनीकरण (काँक्रीटीकरण) तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. जर वेळेत पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात उन्हाळी शेती करणे कठीण होईल. शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पिकाला जीवनदान देण्यासाठी प्रशासन किती तत्परतेने पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.