For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात पारा गाठू शकतो 42 अंश उन्हाच्या तडाख्यापासून वाचणार कसे..?

04:11 PM Apr 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
जिल्ह्यात पारा गाठू शकतो 42 अंश उन्हाच्या तडाख्यापासून वाचणार कसे
Summer Heat
Advertisement

प्रतिबंध हाच उपाय; सनस्ट्रोकपासून वाचण्यासाठी मला काय होतंय, हा बाणा बाजूला ठेवण्याची गरज

Advertisement

संतोष पाटील कोल्हापूर

देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या परिणाम म्हणून शाळांच्या वेळापत्रकातही बदल केला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील आठवडा तापदायक असणार आहे. शनिवारी, 20 रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. शुक्रवारी 19 एप्रिलपासून रात्रीही उष्ण असेल. रात्रीचे तापमानही 26 ते 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. यापुर्वी 2019 च्या एप्रिलमध्ये जिल्ह्यात 41 अंश तापमानाची नोंद झाली होती. यंदा तापमान त्यापुढे जाण्याची शक्यता आहे. मला काय होतंय.. या कोल्हापुरी बाण्याची वागणूक थोडी बाजूला ठेवून उष्माघात (सनस्ट्रोक) पासून वाचण्यासाठी आवश्यक उपायांची गरज आहे.

Advertisement

एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात उष्णतेची लाट वाढू लागली आहे. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे उष्माघाताची शक्यता वाढते. ताप-कणकणी, सर्दी आणि खोकल्यासारख्या हंगामी आजाराने त्रस्त रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. कडाक्याची उष्णता आणि धुळी कणांमुळे न आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण विभागाने सर्वसामान्यांना उन्हापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खाण्यापासून ते वाहतुकीपर्यंत सर्वच बाबतीत विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

चार दिवसापांसून सकाळी 10 वाजल्यापासून उष्णतेची लाट सुरू झाल्याचा आभास होतो. उष्ण वाऱ्याच्या झोताने दिवसभर हैराण केले आहे. दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या काळात उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील दोन दिवस शहराचे कमाल तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदवल, जे सामान्यपेक्षा सरासरी दीड अंश सेल्सिअसने अधिक होते. त्याचवेळी, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदवले, जे सामान्यपेक्षा 2 अंश सेल्सिअस अधिक होते. हवेतील आर्द्रतेचे कमाल प्रमाण 46 टक्के, तर किमान प्रमाण 33 टक्के होते. उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे. अशा स्थितीत प्रतिबंध करूनच उष्णतेच्या लाटेपासून स्वत:ला वाचवता येईल. थेट सूर्यप्रकाशापासून स्वत:चे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण शरीर झाकणारे सुती परंतु हलकी कपडे घाला.

पुढील पाच दिवस असेच वातावरण राहणार आहे.
कमाल      किमान
40              26
41              27
41              26
41              26
42              27

उष्माघाताची लक्षणे
चक्कर, अस्वस्थता, उलट्या, तीव्र डोकेदुखी, जास्त तहान, लघवी कमी आणि लघवीचा गडद पिवळा रंग, जलद श्वास आणि हृदय हृदयाचे ठोके वाढणे. अतिशय उष्ण वातावरणात राहिल्याने उष्णतेचा ताण येतो, ज्यामुळे उष्णतेशी संबंधित आजार होऊ शकतात. ज्यात पायांना सूज, स्नायूंवर पुरळ, दातांमध्ये पेटके, मूर्च्छा येणे, अशक्तपणा यांचा समावेश होतो.

ही पेय देतील आराम
तहान लागण्याची वाट पाहू नका, त्याऐवजी जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या. लिंबू पाणी, ताक ही घरगुती पेये घ्या. लस्सी, फळांचा रस मीठ मिसळून, ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) देखील सेवन केले जाऊ शकते. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी ही हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. उसाचा रस प्या. उष्माघात टाळण्यासाठी रोज धने आणि पुदिन्याचा रस पिणे फायदेशीर ठरते. मिंट टोनसाठी पुदिना आणि धणे लिंबू पाणी प्या. ताक प्या.

उष्माघातापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय
टरबूजमध्ये 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते. उन्हाळ्यात टरबूज खा. कच्चा कांदा खा. उष्माघातावर कांदा खाणे हा सोपा उपाय आहे. कांद्याचा रस काढून लिंबासोबत खाल्ल्याने उष्माघातापासून आराम मिळतो. उष्माघात टाळण्यासाठी कोरफडीचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पोटातील जळजळ कमी होते.

एसीमधून बाहेर आल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात जाऊ नका.
उष्णतेची लाट लक्षात घेऊन दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नका. एसीच्या बाहेर थेट सूर्यप्रकाशात जाऊ नका. दुपारी स्वयंपाक करताना स्वयंपाकघराचा दरवाजा आणि खिडकी उघडा. त्यामुळे स्वयंपाकघर हवेशीर राहील.

सुती कपडे घाला
पांढऱ्या आणि हलक्या रंगाच्या कपड्यांनी बाहेर आला. पातळ, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत. थेट सूर्यप्रकाशात बाहेर जाण्यापूर्वी डोके झाकून घ्या. उन्हापासून डोक्याच्या संरक्षणासाठी छत्री, टोपी, रुमाल वापरा.

Advertisement
Tags :

.