महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीगणेशगीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा सारांश भाग 2

06:53 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाप्पा म्हणाले, प्रत्येकाने आपले कर्म केलेच पाहिजे हा नियम मलाही लागू आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा अवतार घेतो तेंव्हाही स्वस्थ न बसता आवश्यक ती कार्ये करत असतो. खरं तर मला इथून काहीही मिळवायचे नसते पण म्हणून जर मी स्वस्थ बसून राहिलो तर ते पाहून लोकही गप्प बसतील. त्यामुळे समाजव्यवस्था नष्ट होईल. म्हणजे एकप्रकारे समाजाच्या नाशाला मीच कारणीभूत होईन. कर्म दोन प्रकारे करता येते.

Advertisement

पहिल्या प्रकारात केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा मनुष्य करतो तर दुसऱ्या प्रकारात त्याला फळाची अपेक्षा नसते. असे कर्म लोकांच्या भल्याचे असते. लोकांनी एकत्र यावे, त्यातून सगळ्यांनी मिळून काही महान कार्य करावे असे उद्दिष्ट त्यामागे असते. असे कर्म केव्हाही श्रेष्ठ होय. एक मात्र आहे असे निष्काम कर्म करणाऱ्या योगीजनानी जे फळाच्या अपेक्षेने कर्म करत आहेत त्यांना तुम्ही फळाची अपेक्षा मनात धरून कर्म करू नका असे काही सांगण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी असे काही ऐकले तर ते म्हणतील एव्हीतेव्ही फळाची अपेक्षा करायची नाहीये तर मग कर्म तरी कशाला करायचं? परिणामी ते करत असलेले कर्मही ते करणार नाहीत. तेव्हा त्यांना सुधारण्याच्या फंदात न पडता निष्काम कर्म करणाऱ्या योग्याने इतर काय करत आहेत ह्याकडे दुर्लक्ष करून स्वत: मात्र निरपेक्षतेने कर्म करावे आणि इतरांपुढे आदर्श ठेवावा. साधू संत असतात ते त्रिगुणांच्या पलीकडे असल्याने त्यांना निरपेक्ष कर्म करणे सोपे जाते.

Advertisement

ते हे जाणून असतात की, कर्ता ते नसून ईश्वर आहे, त्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे ईश्वरी प्रेरणा होईल त्याप्रमाणे आणि तेव्हढेच काम ते करतात पण ज्याच्या स्वभावात सत्व, रज, तम हे गुण अजून अधिकार गाजवत असतात ते स्वत:ला कर्ता समजत असतात आणि त्यांच्या स्वभावात ज्या गुणाचे प्राबल्य असेल त्याप्रमाणे ते आळस न करता अखंड कार्य करत असतात. सामान्य माणसाला त्रिगुण ताब्यात घेतात आणि  त्यांच्या तालावर नाचवून त्याच्याकडून कर्म करून घेतात. मग त्यांची इच्छा असो वा नसो हे आत्मज्ञानी चांगलेच माहित असते. तसेच त्याला हेही माहित असते की, आत्मतत्व हे त्रिगुणांच्या पलीकडे असते. माणसाचे मन हे विषयात रमते हे स्वाभाविक आहे परंतु विषयात काहीही अर्थ नाही हे ओळखून आत्मज्ञानी मनुष्य मात्र विषयांपासून लांब राहतो.

अर्थातच आत्मज्ञान मिळवणे ही सोपी गोष्ट नसल्याने शहाण्या माणसाने ते मिळेपर्यंत ईश्वर कर्ता आहे हे सतत मनात ठेवून त्याने केलेल्या कर्माबद्दल अहंकार न बाळगता तसेच त्या कर्मातून आपल्याला काही मिळेल अशी अपेक्षा न ठेवता ती ईश्वराला अर्पण करावीत.

ह्याप्रमाणे जे वागतील ते सर्वजण कर्मबंधनातून मुक्त होतील. माणसाचा स्वभाव चंचल असल्याने बाप्पांच्या ह्या सांगण्यावर ज्याचा विश्वास बसणार नाही तो मुर्खासारखा वागत असतो. त्याच्या अशा वागण्याने तो उघडउघड बाप्पांशी शत्रुत्व घेत असतो आणि त्यामुळे नष्ट होतो. त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचे महत्त्व न उमगलेले पण सुशिक्षित असे लोकही त्यांच्या स्वभावानुसार वागत असतात आणि तेच बरोबर आहे असे त्यांना वाटत असते.

त्रिगुणातील ज्या गुणाचे स्वभावात प्राबल्य असते त्यानुसार वागणे म्हणजे स्वत:ला कर्ता समजण्यासारखे असल्याने त्यात काही अर्थ नसतो. त्रिगुणांच्या तावडीत सापडलेला सात्विक मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ समजत असतो तर रज, तम गुणांचे प्राबल्य असलेला मनुष्य काम आणि क्रोध ह्यांचा बळी ठरतो. म्हणून माणसाने योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा म्हणजे त्याची हळूहळू त्रिगुणातीत होण्याच्या दृष्टीने वाटचाल होत राहील.

अध्याय दुसरा सारांश समाप्त

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article