For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुमित नागल मानांकनात 68 व्या स्थानी

06:21 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुमित नागल मानांकनात 68 व्या स्थानी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एटीपीच्या पुरूष एकेरी ताज्या मानांकन यादीत पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणारा भारताचा सुमित नागलने 68 वे स्थान मिळविले आहे. मानांकन क्रमवारीतील सुमितची ही सर्वोच्च कामगिरी आहे. एटीपीच्या यापूर्वीच्या मानांकन यादीत नागल 71 व्या स्थानावर होता. एटीपीच्या मानांकनात भारताचा माजी टेनिसपटू शशी मेननने 1973 साली 71 वे स्थान तसेच विजय अमृत राजने 1980 साली 18 वे स्थान, रमेश कृष्णनने 1985 साली 23 वे तर सोमदेव देववर्मनने 2011 साली 62 वे स्थान घेतले होते

Advertisement
Advertisement
Tags :

.