सुमित नागल उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्थ / नवी दिल्ली
2025 च्या रोसेरिओ चॅलेंजर पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलने एकेरीची उपउपांत्य फेरी गाठताना अर्जंटिनाच्या ओलीव्होचा पराभव केला.
या स्पर्धेत मानांकनात आठवे स्थान मिळविणाऱ्या नागलने ओलीव्होचा 5-7, 6-1, 6-0 अशा सेटमध्ये पराभव केला.
या स्पर्धेत चीन तैपेईचा हेसीन आणि बोलिव्हीयाचा डिलेन यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजयी खेळाडू बरोबर सुमित नागलचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. 2024 मार्चपासून सुमित नागलने एटीपीच्या क्रमवारीत सलग 10 महिने पहिल्या 100 टेनिसपटूमध्ये स्थान मिळविले होते. पण आता त्याने हे स्थान गमविले आहे. 2024 च्या विम्बल्डन स्पर्धेनंतर नागलने 18 स्पर्धांमध्ये केवळ तीन स्पर्धांमध्ये प्रमुख ड्रॉमधील सामने जिंकले आहेत. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत पुरुष दुहेरी 44 वर्षीय रोहन बोपन्ना याचे स्थानही 5 अंकांनी घसरले असून तो आता 21 व्या स्थानावर आहे.