महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुळगा ते बाची रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण

11:09 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहनधारकांची कसरत : जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास, रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे 

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

बेळगाव-बाची या मार्गावरील सुळगा (हिं.) केंबाळी नाल्याजवळ, उचगाव गणेश दूध संकलन केंद्रासमोर (बेळगुंदी फाटा) तर उचगाव फाट्यानजीक, तुरमुरी गावाजवळ रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघाताची तर मालिका सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित सदर खड्डे बुजवावेत, अन्यथा रास्ता रोको करून याचा जाब संबंधितांना विचारला जाईल, असा इशारा या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो  प्रवाशांनी दिला आहे.

बेळगाव-वेंगुर्ले हा मार्ग तीन राज्यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यांना जोडणारा हा दुवा आहे. अनेक प्रवासी बेळगाव भागातून महाराष्ट्र आणि गोव्याकडे जातात. तर महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक प्रवासी याचमार्गे बेळगावलाही येतात. मात्र या रस्त्याची बेळगाव ते बाची 12 किलोमीटर अंतराच्या रस्त्यात अनेक ठिकाणी जवळपास सहा फूट लांबी ऊंदीचे आणि एक ते दीड फूट खोलीचे असे मोठमोठे खड्डे सध्या या रस्त्यावर दिसून येत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून याच ठिकाणी या रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झालेली आहे. हे रस्ते म्हणजे मृत्यूचे सापळेच बनले आहेत. या खराब झालेल्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तसेच लोकप्रतिनिधींचेही सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तरी तातडीने या रस्त्याची दुऊस्ती करणे गरजेचे आहे.

‘वाहनचालकाचे प्राण बालबाल बचावले’

गुरुवारच्या रात्री सुळगा-केंबाळी नाल्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यांमध्ये एका वाहन चालकाची गाडी खड्ड्यात गेल्याने टायर बर्स्ट होऊन थोडक्मयात होणारा मोठा अपघात टळला आणि वाहनचालकाचे प्राण बालबाल बचावले. सदर घटना रात्रीच्या अंधारात वाहन चालवत असताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. या वाहनचालकाला जवळपास 12000 चा मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून या रस्त्याची दुऊस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात

बेळगाव-बाची मार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत की, ते समजूनही येत नाहीत. चारचाकी तसेच दुचाकी वाहने भारधाव जात असताना अकस्मात मध्ये हे खड्डे आल्याने वाहन चालवताना मोठा धोका पत्करावा लागतो. ब्र्रेकचा वापर करावा लागतो. हे करत असताना मोठा धोकाही वाहनांना तसेच वाहनचालकांनाही बसतो. दुचाकी वाहने या खड्ड्यात अडकून पडून अनेकांना दुखापती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते जागरूक राहणे गरजेचे आहे.

- प्रवीण देसाई, उचगाव.

संबंधितांनी खड्डे त्वरित बुजवावेत

सध्या पावसाळा सुरू असल्याने या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांतून पाणी भरल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. आणि यामुळे आमची वाहने या खड्ड्यात अडकून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. हे खड्डे जीवावर बेतले आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने सदर खड्डे बुजवावेत.

- सुधाकर करटे, शिनोळी.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article