For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुकेश चंद्रशेखरला 8 वर्षांचा कारावास

06:21 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुकेश चंद्रशेखरला 8 वर्षांचा कारावास
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असल्याचे भासवून जामीन मिळवण्यासाठी एका न्यायिक अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ठग सुकेश चंद्रशेखरला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी हर्षिता मिश्रा यांनी हा सोमवारी हा निवाडा दिला. अंतिम निकाल देण्यापूर्वी चंद्रशेखरला भारतीय दंड संहितेच्या कलम 170 (सरकारी अधिकाऱ्याचे सोंग घेणे), 189 (सरकारी अधिकाऱ्याला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी धमकी देणे) आणि 507 (अनामिक संदेशाद्वारे गुन्हेगारी धमकी देणे) अंतर्गत दोषी ठरवले होते. आता न्यायाधीशांनी त्याला कलम 170 आणि 189 अंतर्गत प्रत्येकी 2 वर्षे आणि कलम 507 अंतर्गत 4 वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच या शिक्षा एकाचवेळी न भोगता सलग भोगाव्या लागतील असे निर्देश दिले.

Advertisement
Advertisement
Tags :

.