For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीकडून सुजित काल्कल 52 लाखांना, मुंबईकडून अमन 51 लाखांना करारबद्ध

06:41 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीकडून सुजित काल्कल 52 लाखांना  मुंबईकडून अमन 51 लाखांना करारबद्ध
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचा 23 वर्षांखालील गटातील विश्वविजेता सुजित काल्कलला दिल्ली दंगल वॉरियर्सने 52 लाख ऊपयांना करारबद्ध केले आहे, तर टायगर्स ऑफ मुंबई दंगल्स संघाने शनिवारी येथे झालेल्या प्रो रेसलिंग लीगमधील खेळाडूंच्या लिलावादरम्यान 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अमन सेहरावतसाठी 51 लाख ऊपये खर्च केले.

मुंबई दंगल्सने युक्रेनचा विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेता अलेक्झांडर खोत्सियानिव्हस्कीला 33 लाख ऊपयांना करारबद्ध करून आपले विजयाचे मनसुबे स्पष्ट केले. दोन वेळा प्रो रेसलिंग लीगचे विजेते बनलेल्या टायगर्स ऑफ मुंबई दंगल्स संघाने मुख्य प्रशिक्षक चंद्र विजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अशा कुस्तीपटूंना घेण्यावर लक्ष केंद्रित केले, जे विविध वजनी गटांमध्ये सातत्य, अष्टपैलुत्व आणि विजेतेपदाची क्षमता आणतील. या संघाने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नवीन मलिक (74 किलो) याला 34.50 लाख ऊपयांना, 2023 आशियाई कनिष्ठ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मुकुल दहिया (86 किलो) आणि 2023 आशियाई 23 वर्षांखालील स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रोहित राहाल यांना प्रत्येकी 8 लाख ऊपयांना करारबद्ध केले आहे.

Advertisement

मुंबई दंगल्स संघाला अधिक मजबूत करण्यासाठी युक्रेनची 2025 मधील युरोपियन स्पर्धेतील कांस्यपदक विजेती एलिना फिलिपोविच (महिला 57 किलो) आणि पोलंडची ओल्हा पादोशिक (महिला 62 किलो) यांनाही संघात घेतले गेले आहे. कनिष्ठ जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची ज्योती बेरवाल (महिला 76 किलो) हिलाही संघाने 15 लाख ऊपयांना करारबद्ध केले आहे.

दरम्यान, दिल्ली दंगल वॉरियर्स संघही ‘अ’ श्रेणीच्या फेरीत सर्वांत सक्रिय संघांपैकी एक राहिला. त्यांनी पुऊषांच्या 86 किलो गटात इराणच्या हादी वाफेईपूरला 26 लाख ऊपयांना आणि महिलांच्या 57 किलो गटात मेक्सिकोच्या कार्ला अकोस्टाला करारबद्ध केले आहे. दुसरीकडे, हरियाणा थंडर्सने महिलांच्या 62 किलो गटात ऑलिम्पिक पदक विजेत्या इरिना कोलियाडेन्कोला 44 लाख ऊपयांना आणि पुऊषांच्या 86 किलो गटात अझरबैजानच्या अशिरोव अशरफला करारबद्ध करून एक मोठे पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्र केसरीने संघाची खोली आणि संतुलनावर लक्ष केंद्रीत करून पुऊषांच्या 86 किलो गटात आशियाई खेळांतील पदक विजेता दीपक पुनिया आणि महिलांच्या 57 किलो गटात मनीषा भनवाला यांना संघात घेतले आहे. पंजाब रॉयल्सने दिनेश गुलिया (36 लाख ऊपये), प्रिया मलिक (29 लाख ऊपये) आणि रोक्साना झासिना यांना विविध वजनी गटांमध्ये करारबद्ध केले असून यूपी डॉमिनेटर्सने महिलांच्या 62 किलो गटात निशा दहियाला आधारभूत किमतीत आणि पुऊषांच्या 57 किलो गटात राहुल दलालला करारबद्ध केले आहे. सहा वर्षांच्या अंतरानंतर परतणारी प्रो रेसलिंग लीग 16 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. यात सहा संघ आणि भारत तसेच उर्वरित जगभरातील काही सर्वोत्तम कुस्तीपटू सहभागी होतील.

Advertisement
Tags :

.