For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : दक्षिण सोलापूर एनटीपीसी येथे सुजन संगम मेळावा उत्साहात

03:21 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   दक्षिण सोलापूर एनटीपीसी येथे सुजन संगम मेळावा उत्साहात
Advertisement

                     युवक, विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी एनटीपीसीचा सुजन संगम मेळावा

Advertisement

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी परिसरातील औष्णिक विद्युत प्रकल्प ( एनटीपीसी ) येथे सुजन संगम मेला उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी एनटीपीसीचे क्षेत्रीय कर्मचारी निदर्शक ई. सत्य फणी कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परियोजना प्रमुख सोलापूर बी. जे. सी. शास्त्री, मुख्य महाप्रबंधक ( प्रचालन व अनुरक्षण ) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या भागातील कर्मचारी नोकरदार वर्ग शाळेतील विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना या सूजन संगम मेळावाचा आनंद येता यावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

दोन दिवस चाललेल्या या सूजन संगम मेळाव्यामध्ये शैक्षणिक, शालेय साहित्य, कृषी, वाहन, यांच्यासह प्रधानमंत्री कौशल्य विकास विभाग देखील या ठिकाणी उपलब्ध होता. प्लास्टिकपासून विविध साहित्य तयार करण्याच्या कंपनीमध्ये प्रशिक्षणासह नोकरी मिळवून देण्याची हमी या कंपनीमार्फत दिली जात होती.

यामध्ये अनेक तरुण आणि सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी जनसंपर्क अधिकारी अर्चना पाठक यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.