For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हवेची गुणवत्ता खालावताच आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

06:24 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
हवेची गुणवत्ता खालावताच आत्महत्येच्या प्रमाणात वाढ
Advertisement

चीनमध्ये वैज्ञानिक संशोधन

Advertisement

वायू प्रदूषण वाढताच मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढते, विशेषकरून आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असते. पूर्ण चीनमध्ये सुमारे 1400 वायु गुणवत्ता निरीक्षण स्थानके आहेत. त्यांच्याकडून प्राप्त डाटानुसार जेव्हा जेव्हा वायू गुणवत्ता खराब होते, तेव्हा देशात आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या वाढते.

चीनने वायूप्रदूषण कमी करण्याचे जे प्रयत्न केले आहेत, त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या संख्येतही घट झाल्याचे या अध्ययनात म्हटले गेले आहे. चीनमध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. विशेषकरून तेथील महानगरांमध्ये  कोट्यावधी लोकांचे वास्तव्य असून तेथे नेहमीच स्मॉगचे सावट असते.

Advertisement

पूर्ण जगात होणाऱ्या आत्महत्यांमध्ये 16 टक्के आत्महत्या या चीनमध्ये होत असतात. परंतु मागील काही वर्षांमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात घट देखील झाली आहे. यामागे अनेक कारणे असू शकते, म्हणजेच उत्पन्नात वाढ, सांस्कृतिक बदल यांचा यात समावेश असू शकतो. परंतु नव्या अध्ययनात वायु गुणवत्तेचा डाटाही सामील करण्यात आला आहे.

खराब हवामानात श्वसनात त्रास होत असल्याने लोकांदरम्यान आत्महत्येची इच्छा वाढू लागते असे या अध्ययनात आढळून आले आहे. 2013 मये चीनने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. एकर पॉल्युशन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. यामुळे उद्योगांमधून उत्सर्जित होणारे प्रदूषण कमी करण्यात आले.

वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाला संतुलित करण्याचा प्रयत्न केला गेला. कोळशाच्या जागी नैसर्गिक वायूच्या वापराला प्राधान्य देण्यात आले. सौर ऊर्जा आणि पवनचक्कीला चालना देण्यात आली. यामुळे हवेत मोठी सुधारणा झाली. याचदरम्यान आत्महत्येच्या दरात घट झाली. 2010-21 दरम्यान आत्महत्येच्या दरात प्रति लाख व्यक्तींमागे वार्षिक 10.88-5.25 इतकी घट झाली आहे.

वायू प्रदूषण आणि आत्महत्या यांच्यातील कनेक्शन शोधण्याचा आमच्या टीमने प्रयत्न केला. तसेच यावेळी वैज्ञानिक कारणेही शोधून काढण्यात आली. हे एकप्रकारे थर्मल इनव्हर्जन होते, म्हणजेच खाली असलेली थंड हवा आणि वर असलेल्या उष्ण हवेदरम्यान प्रदूषण अडकलेले असते. हे काही तांसासाठी असते, परंतु यामुण्s र आठवड्याला पीएम 2.5 चे प्रमाण हवेत एक टक्क्यापेक्षा अधिक वाढत असते. हे धोकादायक कण श्वसनामागे थेट मेंदूपर्यंत पोहोचतात, यामुळे मेंदूचे केमिकल बॅलेन्स 24 तासांच्या आत बदलते. यामुळे मानसिक स्थिती कमजोर होत जाते, असे उद्गार चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँग काँगचे अर्थतज्ञ पेंग झांग यांनी काढले आहेत.

थर्मल इनव्हर्जन झाल्याच्या काही आठवड्यांदरम्यान लोकांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती वाढत जाते. जर ही प्रक्रिया सार दिवसांपेक्षा अधिक काळानंतरही न थांबल्यास लोक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. सध्या चीनमध्ये आत्महत्येच्या दरात घट झाली आहे. 2013-17 दरम्यान चीनमध्ये 46 हजार लोकांनी आत्महत्या केली होती. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी होते. यासंबंधीचे अध्ययन अलिकडेच नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित झाले आहे.

Advertisement
Tags :

.