सावंतवाडीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या
सावंतवाडी -
शहरातील जुनाबाजार(होळीचा खुंट ) येथील रहिवासी राजेश शिवाजी पांगम (४८) या तरुणाने आपल्या राहत्या घरातील खोलीत सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले . राजेश पांगम हे काही दिवसांपासून आजारी होते. आजाराला कंटाळून त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण , सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे , पोलीस हवालदार अनिल धुरी ,पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे , मयूर निरवडेकर यांनी आत्महत्येचा पंचनामा केला . सावंतवाडी पोलीस ठाण्यात मयत यांचा मुलगा जय पांगम याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पांगम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांची शहरात मूर्तिशाळा होती . पश्चात पत्नी , दोन मुलगे व अन्य परिवार आहे .