For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्जबाजारी झालेल्या व्यक्तीची आत्महत्या

03:33 PM Jan 04, 2025 IST | Radhika Patil
कर्जबाजारी झालेल्या व्यक्तीची आत्महत्या
Advertisement

सातारा : 

Advertisement

सातारा शहरातील डी-मार्ट नजीक असलेल्या खाणीत शुक्रवारी दुपारी सडलेल्या अवस्थेत एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शंभू मंगलदास तांबोळी असे त्याचे नाव आहे. तो फलटण तालुक्यातील पिंपळवाडी गावचा रहिवाशी आहे. कर्जबाजारीपणामुळे तो तणावात होता. तो मनोरूग्णही असल्याने त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली.

शंभू तांबोळी हा पुण्याला कामाला होता. त्याच्यावर कर्ज असल्याने तो सतत तणावात राहत होता. तो मनोरूग्णही असल्याने त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार केले होते. या कर्जबाजारीपणाला तो कंटाळल्याने त्याने चार दिवसापुर्वी सातारा शहरातील डी-मार्ट जवळील डोंगर खाणीत गेला. त्याने त्या खाणीत उडी मारली. खाणीत पडल्याने त्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले होते. त्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. चार-पाच दिवसांनी या ठिकाणाहून दुर्गंधी व वास येऊ लागल्याने काही लोकांनी पाहिले. तेव्हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आला. याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक तांबे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा सुरू केला. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांना बोलवून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नेंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.