महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जेईईची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

06:01 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोटा

Advertisement

राजस्थानच्या कोटामध्ये आयआयटी जेईईची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. 31 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वीच या विद्यार्थिनीने स्वत:चे आयुष्य संपविले आहे. पोलिसांना मृतदेहाजवळून एक सुसाइड नोटही प्राप्त झाले आहे. यात माझ्याकडे अन्य कुठलाच पर्याय नव्हता असे नमूद आहे.

Advertisement

कोटाच्या एका कोचिंग सेंटरमध्ये जेईई मेन्सची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:च्या खोलीत गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. विद्यार्थिनी स्वत:च्या खोलीत अभ्यास करण्यासाठी गेली होती, परंतु नंतर बाहेर न पडल्याने आसपासच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले होते.

यापूर्वी 24 जानेवारी रोजी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. नीटची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्याने गळफास लावून घेत स्वत:चे आयुष्य संपविले होते. हा विद्यार्थी उत्तरप्रदेशच्या मुरादाबादचा रहिवासी होता. त्याने देखील परीक्षेच्या भीतीने आत्महत्या केली होती. सातत्याने होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांमुळे कोटा प्रशासनावरील दबाव वाढला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article