म्हादरे येथे अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
सातारा :
म्हादरे(ता. सातारा ) येथील डोंगराच्या मध्यभागी अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यांची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस आणि शिवेंद्रराजे ट्रेकर्स घटना स्थळी पोहचले असून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास म्हादरे गावाजवळील भादरपासून डोंगराच्या मध्यभागी साधारण दोन किलोमीटर अंतरावरती झाडीत एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता मृतदेह काढण्यासाठी शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांना बोलवण्यात आले आहे. ट्रेकर्स च्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या व्यक्तीने दहा दिवसापूर्वी गळफास घेतल्याने मृतदेह सडलेला आहे. या व्यक्तीजवळ कोणतीही कागदपत्रे नसल्याने ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.