For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एक देश, एक निवडणूक’वर मागवल्या लोकांकडून सूचना

06:22 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एक देश  एक निवडणूक’वर मागवल्या लोकांकडून सूचना
Advertisement

15 जानेवारीपर्यंत मते मांडता येणार, सार्वजनिक सूचना जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. आता समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर सर्वसामान्यांकडून मत मागवले आहे. सर्वसामान्य लोक दहदा.gदन्.ग्ह या वेबसाईटवर आपले मत नोंदवू शकतात किंवा sम्-प्त्म्@gदन्.ग्ह या ईमेलवरही आपली मते पाठवू शकतात. त्यासाठी 15 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Advertisement

समितीने सार्वजनिक सूचनाही जारी करून लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय रचनेत योग्य ते बदल करण्यासाठी सर्वसामान्यांकडून लेखी सूचना मागविण्यात येत असल्याचे या प्रकरणावर नोटीस जारी करताना समितीने म्हटले आहे. सर्वसामान्यांकडून प्राप्त झालेल्या सूचना 15 जानेवारी 2024 पर्यंत समितीसमोर विचारार्थ ठेवाव्यात, असेही समितीने पुढे सांगितले. समितीने यासाठी वेबसाईट आणि ईमेल जारी करून सर्वसामान्यांची मते मागवली आहेत. देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी सध्याच्या कायदेशीर प्रशासकीय रचनेत बदल करण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याप्रश्नी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या आतापर्यंत बऱ्याच आढावा बैठका झाल्या आहेत.

Advertisement
Tags :

.