कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुरमुरीनजीक उसाचा ट्रक कलंडून मोठे नुकसान

11:07 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

उचगाव-बाची मार्गावरील तुरमुरी नाला ते बाची यामधल्या पट्ट्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे उसाने भरलेला ट्रक कलंडून मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी घडली. यामुळे शेतकरी आणि ट्रकमालकालाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. हिंडलगा-बाची या मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील तुरमुरी नाल्यालगतच बाची गावाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनचालकांना आपली वाहने कशी चालवावी याचा अंदाज येत नसल्याने  उसाने भरलेल्या ट्रकची खड्ड्यांमध्ये चाके गेल्याने ट्रक कलंडला. आणि ट्रकमधील संपूर्ण ऊस रस्त्यावर विखुरला गेला. परिणामी काहीकाळ या रस्त्यावरची वाहतूकही ठप्प झाली होती. या ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. यासाठी ठेकेदारांनी तातडीने पडलेले खड्डे जेसीबीच्या साह्याने सपाटीकरण करावे आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशीही मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article