For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : करडवाडीत ऊसवाहतूक ट्रॅक्टर पलटी; मोटरसायकलचा चक्काचूर

12:33 PM Dec 05, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   करडवाडीत ऊसवाहतूक ट्रॅक्टर पलटी  मोटरसायकलचा चक्काचूर
Advertisement

                                             करडवाडी बसथांब्याजवळ ट्रॅक्टर अपघात

Advertisement

करडवाडी : करडवाडी (ता. भुदरगड) येथे बस थांब्यानजीक तांबळे कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ड्रायव्हरचं नियंत्रण न राहिल्यामुळे रस्त्यावरच पलटी झाल्याची घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. साईटला लावलेल्या मोटरसायकलवर ट्रॅक्टर दोन ट्रॉलीसह पलटी झाल्याने मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने मोटरसायकल चालक बाजूला असल्यामुळे जीवितहानी टळली.

गेल्या काही दिवसापासून कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बाहतूक बाढलेली आहे. परिणामी या मार्गावरून साईट घेण्यावरून वादावादीचे प्रसंग नेहमीच घडत आहेत. यातच गारगोटी- पाटगाव मेन रोडवर एकीकडे तांबाळे कारखाना तर विरुद्ध बाजूलाबिद्री, फराळे, आदी कारखान्याकडे ऊस वाहतूक चालू असून मडीलगे मधून तांबाळेकडे ऊस बाहतूक करणारा ट्रॅक्टर दोन ट्रॉलीसह रस्त्यावरच पडल्याने मोटरसायकल उसाच्या ट्रॉली खाली सापडल्याने गाडीचा चक्काचूर झाला.

Advertisement

भरस्त्यामध्येच दोन ट्रॉल्या पलटी झाल्याने गारगोटी व कडगावकडून येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने ऊस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Advertisement
Tags :

.