कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Miraj : कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणीला वेग; मात्र दराची संभ्रमावस्था

02:16 PM Nov 10, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                  कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणी सुरू

Advertisement

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणी जोरात सुरू असून दररोज शेकडो टनांची ऊस वाहतूक सुरू आहे मात्र ऊस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून ऊस दराकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. विशेषतः म्हैसाळ पाणी योजनेमुळे शेतकयांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळेच म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रात कवठेमहांकाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे.

Advertisement

गेली दोन वर्षे सलग म्हैसाळचे पाणी विहिरीवर आल्याने शिवाय गेले चार महिने पाणसानेही शेतकऱ्यांना साथ दिल्याने यंदा ऊसाची पिकेही जोमात आली आहेत. चार पाच वर्षात कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊस उत्पादकांना खरा दिलासा तो म्हणजे अथणी शुगर आणि दत्त इंडिया या कारखान्यांनी. मोठ्या प्रमाणात उसाची लागण झाल्याने या कारखान्यांना कवठेमहांकाळ तालुक्यातून हजारो टन ऊस गाळपासाठी मिळाला. विशेष म्हणजे शेतक्रयांना ऊसाची बिलेहीवेळेत मिळाली. ऊसतोड उशिरा झाली असेल. पण कारखान्यांनी ऊस शिल्लक ठेवला नाही ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. चालू वर्षात डफळापूरचा श्रीपती शुगर, आरगेचा मोहनराव शिंदे कारखाना या कारखान्यांचे गाळप लवकर सुरू झाले. दत्त इंडीया, उदगीर शुगर व अथणी शुगरचे गाळप सुरू नसले तरी त्यांनी तोडणी सुरू केली व अन्य कारखान्यांकडे ऊस पाठविला.

महाराष्ट्र ब कर्नाटकात ऊसदराबाबत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी दराची कोंडी फुटली आहे. अथणी शुगरचा ३३०० रूपये प्रती टन दर जाहीर झाल्याचे सांगण्यात येते. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केला नाही. कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी दराची विचारपूस न करता ऊस तोडणी करीत आहेत.

सुरुवातीला ऊसतोडणी झाली नाही तर पुन्हा शेतक्रयांची ऊस तोडणी मुकादम अडवणूक करतात. ऊस तोडणीसाठी मनमानी करतात. त्यामुळे सुरवातीला ऊस तोडणीसाठी शेतकयांचा कल असतो. अथणी शुगर लवकर सुरू झाला तर ऊसतोडणीला वेग येणार आहे. शिवाय महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर कारखानेही कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसासाठी येतात. म्हैसाळ व टेंभूच्या पाण्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे चार लाख टनाच्या आसपास ऊस गाळपासाठी जाणार आहे. त्यामुळेच शेतकयांच्या नजरा आता ऊसदराकडे लागून राहिल्या आहेत.

Advertisement
Tags :
#FarmersIssue#kolhapurnews#MaharashtraAgriculture#SugarcaneHarvest#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#TemebhuProjectKavthemahankalMhaisalProject
Next Article