For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यासह देशात साखरेचे उत्पादन घटणार

11:27 AM Dec 19, 2024 IST | Radhika Patil
राज्यासह देशात साखरेचे उत्पादन घटणार
Sugar production in the state and the country will decrease
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 
देशात गतवर्षीच्या तुलनेत 501 पेेकी
472 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. मागील वर्षी 319 लाख टन साखर उत्पादीत झाली होती. मात्र यंदाच्या वर्षी देशभरात सुमारे 40 लाख टन साखर कमी उत्पादीत होईल, असा अहवाल राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या 15 डिसेंबर रोजी प्रसिध्द झालेल्या अहवालात म्हटले आहे. तर महाराष्ट्रात 183 कारखाने सुरू असून यंदाच्या वर्षी 87 लाख टन साखर उत्पादीत होण्याची शक्यता आहे. देशाच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रातून सुमारे 75 टक्के साखर उत्पादनात घट होणार आहे.

Advertisement

मागील वर्षीची तुलना करता 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील 191 पैकी 183 कारखाने सुरू आहेत. आठ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला नाही. मागील वेळी 295.83 लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदाच्या वर्षी 207 .41 लाख टन गाळप झाले. 24.85 लाख टनाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 16.80 लाख टन साखरेचं उत्पादन झाले. 8.05 लाख टन साखरेच उत्पादन कमी झाले आहे. मागील वर्षी 8.40 टक्के रिकव्हरी होती तर यावेळी त्यामध्ये घट होवून 8.10 टक्के झाली.

उत्तरप्रदेशमध्ये मागील वर्षी इतकेच 120 कारखाने सुरू आहेत. मागील वर्षीपेक्षा आताच 14. 31 लाख टन उसाचे गाळप उत्तरप्रदेशने जादा केले आहे. उसाचे गाळप जादा असले तरी साखर उत्पादन 22.65 आणि 22.95 लाख टन साखरेच उत्पादन झाले आहे. साखर उत्रायात घट झाली असून मागील वर्षी सरासरी साखर उतार 9.30 वरुन 8.90 टक्क्यावर आला आहे. गत हंगात साखर उत्पादन 103. 65 वरुन 98 लाख टन होण्याची शक्यता असून उत्तरप्रदेशात सरासरी 5.65 लाख टन साखर कमी उत्पादीत होणार आहे.

Advertisement

कर्नाटक राज्यात मागील वर्षी पेक्षा तीन जादा कारखान्यासह 76 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. तरी 43.23 लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. मागील वर्षी 205.88 वरुन यंदाच्या वर्षी 162.65 लाख टन उसाचे गाळप राज्यात झाले. 17.5 लाख टनाच्या तुलनेत 13.5 लाख टन साखर उत्पादन झाली. सरासरी उत्तरा 8.50 तर यंदा 8.30 टक्के आहे. 53 लाख टनाच्या तुलनेत 45 लाख टनचच साखर हंगाम अखेरीत उत्पादीत होईल असे अहवाल दर्शवतो.

गुजरातमध्ये 16 पैकी 14 कारखान्यांनी 30.81 लाख टनाच्या तुलनेत 22.09 लाख टन उसाचे गाळप केले आहे. 8.72 लाख टन उसाचे कमी गाळप झाले आहे. 2.65 च्या तुलनेत यंदा फक्त 1.80 लाख टन साखर निर्मीती झाली. रिकव्हरी सरासरी 8 टक्के असून मागली वर्षी इतकीच सरासरी 9 लाख टन साखर उत्पादीत होणार आहे. हरयाना 14 पैकी 13 कारखाने सुरू आहेत. 11.31 च्या तुलानेत 2.77 लाख टन उसाचे गाळप कमी झाले. 0.95 वरुन 0.70 लाख टनांवर घसरले. आठ टक्के रिकव्हरीने गतवर्षी इतकीच सहा लाख टन साखर उत्पादीत होणार आहे. मध्यप्रदेशात 18 पैकी 17 कारखाने सुरू आहेत. 6.51 च्या तुलनेत उस गाळप वाढून 8.13 लाख टन झाले. 1.62 लाख टन जादा गाळप झाले. 0.55 वरुन 0.65 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. सरासरी आठ रिकव्हरीने सरतेशेवटी पाच लाख टन साखर उत्पादीत होईल. पंजाबमध्ये सर्व 15 कारखाने सुरू असून 2.50 लाख टनावरुन चार लाख टन उसाचे गाळप झाले. साखर उत्पादन 0.20 वरुन 0.30 लाख टन झाले. रिकव्हरी एक टक्क्यानी घटून 7.50 टक्क्यावर आली. एकूण साखर उत्पादन सहा लाख टन होण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश, बिहार, तेलंगाणा, उत्तराखंडासह इतर राज्यात 33 कारखान्यापैकी 29 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. 24.31 लाख टन गाळप मागील हंगामात झाले होते. यावर्षी 37.72 लाख टन उसाचे गाळप झाले. 3.05 च्या तुलनेत यंदाच्या वर्षी या राज्यात 3.25 लाख टन साखर उत्पादीत झाली आहे. सरासरी 8.50 टक्के उतारा असून 14.4 लाख टन साखर मागील वर्षी मिळाली. यंदाच्या वर्षी 15.50 लाख टन साखर उत्पादीन होणार आहे.

                                      तामीळनाडूतील 16 कारखाने बंद
तामीळनाडू मागील वर्षीपेक्षा
16 कारखाने बंद असून फक्त पाच कारखाने सुरू आहेत. 20.22 वरुन 10.84 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. 9.38 लाख टन उस कमी पडला आहे. साखर उत्पादन 1 .80 लाख टनावरुन 0.90 लाख टनावर आले आहे. 2.25 लाख टन सारखेचं उत्पादन कमी झाले आहे. इतर नगदी पिकांकडे शेतकरी वळल्याने ऊस उत्पादन घटले आहे. त्यामुळे तामिळनाडूत 80 टक्के कारखाने बंद झाले आहेत.

                                              अहवालावर दृष्टीक्षेप
देशभरात
501 पैकी 472 कारखाने सुरू असून 29 कारखाने बंद आहेत. 850.92 लाख टनाच्या तुलनेत 719.24 लाख टन म्हणजेच 131.68 लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. साखर उत्पादन पाहता, मागील वषी 74.20 वरुन 60.85 लाख टनावर घसरले. 13.35 लाख टन साखर कमी उत्पादीत झाली आहे. 8.72 वरुन 8.46 टक्क्यावर साखर उतारा आला आहे. साखर उत्पादन 319 वरुन 280 लाख टनांवर येणार आहे.

                                   महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटकाचा वाटा
देशात एकूण
501 साखर कारखाने आहेत. यामध्ये महाराष्ट्रात (191), उत्तर प्रदेश (120) आणि कर्नाटकात (73) एकूण साखर कारखान्यापैकी 501 पैकी 384 कारखाने आहेत. यापैकी 379 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. मागील वर्षी देशाच्या एकूण 319 लाख टन साखरेपैकी या तीन राज्यात 266 .85 लाख टन साखर उत्पादीत झाली होती. यंदाच्या वर्षी 230 लाख टन साखर उत्पादीत होण्याचा अंदाज आहे. एकूण साखर उत्पादनात या तीन राज्यांचा 83 टक्के इतका आहे. संपूर्ण देशात या तीन राज्यात मिळून उसाचे गाळप आणि साखर उत्पादन दोन्ही सरासरी 87 टक्के आणि रिकव्हरी 8.50 टक्के आहे.

टक्केवारीत तुलनेत वजावट

सहा टक्के कारखाने बंद

गाळप 15.50 टक्के कमी

उत्पादन 18 टक्के कमी

साखर उतारा 3 टक्के कमी

एकूण साखर उत्पादन कमी 12.15 टक्के

Advertisement
Tags :

.