Sharad Pawar | साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत ; खा शरद पवार यांची अपेक्षा
डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला १२ लाखांचे बळ;
औंध -महाराष्ट्रात साखर कारखान्याचे मोठे जाळे आहे. कारखानदारांनी कारखाना कार्यक्षेत्रातील चांगले मल्ल दत्तक घेतले तर निश्चितच गुणवत्ता असलेले मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला पुढील दोन वर्षे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा सराव करणे आणि खुराकासाठी १२ लाख रुपयांचा धनादेश हर्षवर्धनचे प्रशिक्षक अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचेकडे सुपूर्द केला यावेळी शासकीय कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी उद्योजक मोहसीन बागवान उपस्थित होते.
तुफानी ताकदीचा कुस्ती हा अत्यंत खर्चिक खेळ आहे. जेष्ठ नेते खा शरद पवार यांना पैलवानांच्या अडीअडचणीची जाणीव आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येणाऱ्या प्रतिभावंत होतकरू खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी केवळ कौशल्याची नव्हे, तर भक्कम आर्थिक पाठबळाचीही तितकीच गरज असते. आहार, परदेशी दर्जाचे प्रशिक्षण, सप्लिमेंट्स आणि वैद्यकीय सुविधा आदी सोईसुविधा उपलब्ध झाल्यास महाराष्ट्रातील मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील असा विश्वास खा शरद पवार यांना आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलासाठी 25 लाख
पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये सराव करणाऱ्या मल्लांना अद्ययावत सोईसुविधा निर्माण व्हाव्यात.तालमीत मॅट्स आणि जिमच्या साहित्यात वाढ झाली पाहिजे.यामुळे भविष्यात आणखी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडतील ही दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून संकुलासाठी जाहीर केलेले २५ लाख रुपये देखील चेकच्या स्वरूपात अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत.