For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साखर कंपन्यांचे समभाग तेजीत

06:35 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
साखर कंपन्यांचे समभाग तेजीत
Advertisement

मुंबई:

Advertisement

युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारतीय शेअर बाजारात सोमवारी घसरण असताना साखर कंपन्यांचे समभाग मात्र तेजीत दौडताना दिसून आले. काही समभागांनी तर सर्वाधिक 14 टक्के इतकी वाढ इंट्रा डेदरम्यान नोंदवली होती. धामापूर शुगर मिल, दालमिया भारत शुगर, द्वारकेश शुगर, रेणुका शुगर, बजाज हिंदुस्थान शुगर आणि प्राज इंडस्ट्रीज यांच्या समभागांची सोमवारी गुंतवणूकदारांनी खरेदी केली. दालमिया भारतचा समभाग 14 टक्के वाढत 386 रुपयांवर, द्वारकेशचा समभाग 11 टक्के वाढत 46 रुपयांवर तर धामापूरचा समभाग 8 टक्के वाढला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.