दुस-यावर बोट दाखविण्यापूर्वी राजन तेलींनी आत्मपरिक्षण करावे : सुधीर दळवी
दोडामार्ग – वार्ताहर
फसवणूकीचा खरे सूत्रधार हे माजी आमदार राजन तेली आहेत. ते नेहमी दुस-यावर बोट दाखविण्यापूर्वी आपण स्वतः किती जणांची फसवणूक केली आहे याचे आत्मपरिक्षण करावे असा गंभीर आरोप भाजपचे जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांनी केले आहे. श्री. दळवी पुढे म्हणाले की, पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर आरोप करणे म्हणजे उंटा वरून शेळी हाकण्याचा प्रकार आहे. ज्या जिल्हा बँकचे प्रतिनिधित्व राजन तेली यांनी केलं. त्याच जिल्हा बँकची बदनामी स्वतः च्या स्वार्थासाठी करणे योग्य नाही. फसवणूक करणे हा राजन तेली यांचा धंदा आहे. खोट्या प्रत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री नितेश राणे हेच सूत्रधार आहेत म्हणून त्याची बदनामी करायची बंद करा आम्ही ती सहन करणार नाही. शिवाय राजन तेली ज्या ज्या पक्षात गेले तिथे तिथे त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांची फसवणूक केली आहे. आपल्या स्वार्थासाठी त्यांनी नेहमी पक्षांतर केले आहे. राजन तेली आपल्याच पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांचीही फसवणूक करत असतात. सिंधुदुर्ग बँक हि सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे त्यामुळे विनाकारण बँकेची बदनामी नको. असेही दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
‘त्या’ पंधरा दिवसांचे काय ??
दरम्यान दळवी म्हणाले की, पुराणातील कैकयीने श्रीरामाना १४ वर्षांच्या वनवासाला पाठविले होते. त्याचप्रमाणे राजन तेली हे आमदार असताना आपणाला ही पंधरा दिवसांत एक काम करतो असे सांगितले मात्र अद्याप ते काम त्यांनी केले नाही. ते नेहमी कार्यकर्त्यांशी खेळतात त्यांना कोणाचेही सोयर सुतक नाही आहे त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यावर बोलू नये स्वतःचे पहावे असा उपरोधिक टोला देखील दळवी यांनी लगावला आहे.