कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर

12:59 PM Apr 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड झाली आहे. आडीवरेकर यांच्या नावाची घोषणा भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी रविवारी केली . यावेळी पक्ष निरीक्षक चारुदत्त देसाई, राष्ट्रीय सदस्य पुखराज पुरोहित, प्रदेश उपाध्यक्ष लखम राजे भोसले ,मावळते शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग ,गुरु मठकर ,चंद्रकांत जाधव, एडवोकेट अनिल निरवडेकर ,सुकन्या टोपले ,सिद्धार्थ भांबुरे आदी उपस्थित होते. भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आडीवरेकर यांच्या नावाची घोषणा महेश सारंग यांनी केली. सावंतवाडी शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष बसवून भाजपचा झेंडा पुन्हा फडकविण्यात येणार आहे सावंतवाडी शहरात साडेसहा हजार प्राथमिक सदस्य नोंदणी झाली आहे. त्याशिवाय सक्रिय सदस्य आहेत. शहरात भाजप पक्ष एक नंबर झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्यात येणार आहे तशी तयारी करण्यात आली आहे असे महेश सारंग यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत युतीबाबत वरिष्ठ पातळीवर ठरवण्यात येणार आहे . परंतु, स्वबळावर लढवावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे त्यानुसार आमची तयारी आहे . सावंतवाडी शहरात भाजपच्या माध्यमातून विकास कामे झालीआहेत. खासदार नारायण राणे ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी यापूर्वी निधी आला. आगामी काळात शहराचा विकास आराखडा बनवून पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे नूतन शहर मंडल अध्यक्ष आडीवरेकर यांच्यामार्फत सुपूर्द करण्यात येईल असे सारंग यांनी स्पष्ट केले. भाजपने ज्यांना ओळख दिली त्यांनी पक्ष फोडण्याची भाषा करू नये भाजपचा कोणीही पदाधिकारी अन्य पक्षात गेलेला नाही असे सारंग म्हणाले . नूतन मंडळ अध्यक्ष आडिवरेकर हे चांगल्या पद्धतीने काम करून शहरात भाजप बळकट करतील असा आशावाद सारंग यांनी व्यक्त केला नूतन शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी सावंतवाडी शहरात भाजप बळकट करून आगामी नगरपालिका निवडणुकीत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यात येईल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महेश सारंग आणि शहरातील माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरात पक्ष बळकट करण्यात येईल असे स्पष्ट केले. आडिवरेकर यांचे महेश सारंग आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# traun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news
Next Article