For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संस्कृती महिला मंडळातर्फे सुधा मूर्ती यांचा सत्कार

09:27 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
संस्कृती महिला मंडळातर्फे सुधा मूर्ती यांचा सत्कार
Advertisement

बेळगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्कृती महिला मंडळाने पद्मभूषण डॉ. सुधा मूर्ती यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी महिलांची जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कुटुंब सांभाळतानाच महिलांनी सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात रे•ाr महिला संघटना, मैत्री क्लब, पतंजली योग केंद्र यांच्यासह अन्य सदस्या उपस्थित होत्या. संस्कृती महिला मंडळाच्या चेअरपर्सन शांता जंगल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी सुधा मूर्ती यांच्या मोठ्या भगिनी डॉ. सुनंदा कुलकर्णी व रमेश जंगल उपस्थित होते. प्रतिभा सिद्दप्पगौडर यांनी स्वागत केले. सुनीता सुरेश यांनीही आपले विचार मांडले. अनुश्री देशपांडे यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.